कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याबद्दल पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथील तरुणावर गुरुवारी रात्री शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अभिजित शंकर पाटील (वय ३०) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, अभिजित पाटील या तरुणाने करवीर तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय तरुणीशी ओळख करून घेतली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले तसेच वारंवार शिवीगाळ व मारहाण करून तिच्यावर अत्याचार केले. ही घटना जुलै २०२० ते दि. ९ मार्च २०२१ या कालावधीत कोल्हापुरात शिवाजी पेठ, सदरबाजार तसेच हिंजवडे फेज (पुणे) येथे घडली. वारंवार अत्याचार करूनही तुला काय करायचे ते कर अशी त्याने धमकी दिल्याचे पीडितेने शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यानुसार अभिजित पाटील याच्यावर अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला आहे.