शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

एटीएम ‘आऊट आॅफ आॅर्डर’

By admin | Updated: May 16, 2017 01:21 IST

‘रॅन्समवेअर’ची भीती : अपुऱ्या चलन पुरवठ्याबरोबर आता व्हायरसचे कारण

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अपुऱ्या चलन पुरवठ्याबरोबरच ‘रॅन्समवेअर’ या व्हायरसच्या भीतीमुळे सोमवारी कोल्हापूरमधील बहुतांश ‘एटीएम’ मशीन बंद होती. एटीम मशीनच्या बाहेर ‘एटीएम आऊट आॅफ आॅर्डर’ असे बोर्ड लटकलेले होते. बहुतांश एटीएममध्ये हे चित्र दिसून आले. यामुळे पैसे काढण्यासाठी ग्राहकांना अनेक ठिकाणी शोधाशोध करावी लागली. जिल्ह्यात विविध ३३ बँकांच्या ५८८ शाखा आणि ५७५ एटीएम कार्यान्वित आहेत. या बँकांना दैनंदिन व्यवहारासह एटीएमकरिता आवश्यक चलनापेक्षा कमी पुरवठा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून होत आहे. त्यामुळे महिन्यातील काही दिवस बँकांना आपली अधिकतर एटीएम बंद ठेवावी लागत आहेत. जी काही एटीएम सुरू आहेत. त्याठिकाणी इतर बँकांच्या ग्राहकांचा ओघ वाढत आहे. त्यामुळे तेथील पैसे काही तासांच संपत असल्याने ‘कॅश संपली आहे’, ‘आऊट आॅफ कॅश’, अशा स्वरुपातील फलक झळकत आहेत. पैसे उपलब्ध असणाऱ्या एटीएमसाठी ग्राहकांना शोधाशोध करावी लागत आहे. सायंकाळी पाचनंतर अशा एटीएमच्या आवारात गर्दी वाढली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलादेखील दैनंदिन व्यवहारांसाठी पुरेसे चलन उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, एटीएम बंदबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आरबीआयकडून पुरेसा चलन पुरवठा होत नसल्याचे कारण त्यांनी सांगितले शिवाय पुरेसे चलन मिळविण्यासाठी बँकांचा करेन्सी चेस्ट आणि वरिष्ठ कार्यालयाच्या माध्यमातून रोज आरबीआयकडे पाठपुरावा सुरू आहे. एटीएममध्ये चलन उपलब्ध नसले, तरी बँकेतून पैसे देण्याची मर्यादा कमी केली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.नोकरदारांची अडचणसकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत नोकरी करणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. दिवसभर कामावर असल्याने बँकांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे त्यांना पैसे काढण्यासाठी एटीएमचा आधार आहे. मात्र, चलन टंचाई, व व्हायरसच्या धोक्याने अधिकतर एटीएम बंद असल्याने मोठी अडचण येत आहे. ‘व्हायरस’ची भीतीरॅन्समवेअर या व्हायरसच्या भीतीमुळे काही बँकांनी त्यांची एटीएम सोमवारी बंद ठेवली होती. संबंधित व्हायरसच्या माध्यमातून सायबर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त करत नेट बँकिंग, डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्यात येऊ नयेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव आणखी दोन दिवस काही एटीएम बंद राहणार आहे, अशा स्वरुपातील संदेश व्हॉटसअपच्या माध्यमातून दिवसभर फिरत होते. या स्वरुपातील संदेश आणि व्हायरसच्या भीतीपोटी अनेकांनी आॅनलाईन पद्धतीने व्यवहार करणे टाळले.