शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

सहायक फौजदारास बेदम मारहाण

By admin | Updated: May 24, 2016 00:58 IST

दोघा मद्यपींना अटक : उमा टॉकीज चौकातील घटना

कोल्हापूर : उमा टॉकीज सिग्नल चौकात रेड सिग्नल पडल्यानंतर थांबण्याचा इशारा केल्याचा राग मनात धरून दोघा मद्यपी तरुणांनी वाहतूक शाखेच्या सहायक फौजदारास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. जानबा शंकर देसाई (वय ५७, रा. पोलिस लाईन, मुख्यालय) असे त्यांचे नाव आहे. सोमवारी भर दिवसा रस्त्यावर पोलिसाला होत असलेली मारहाण पाहून नागरिकांनी दोघा तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित आरोपी साईदास संजय शिंदे (वय २७, रा. टेंबे रोड, शिवाजी स्टेडियम), प्रीतम सतीश शिंदे (३०, रा. रविवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत. गेल्या दोन महिन्यांत वाहतूक शाखेच्या पोलिसांना मारहाण झालेली ही तिसरी घटना आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, उमा टॉकीज सिग्नल चौकात वाहतूक विभागाचे सहायक फौजदार जानबा देसाई हे ड्युटीवर होते. दुपारी चारच्या सुमारास रेड सिग्नल लागल्याने गोखले कॉलेजकडून येणाऱ्या वाहनांना देसाई यांनी हाताने थांबण्याचा इशारा केला. यावेळी दुचाकीवरून दोघे तरुण पुढे आले. त्यांनी देसाई यांना अरेरावी करीत आम्हाला थांबायला का लावतोस? असे म्हणून निघून गेले. त्यानंतर काही वेळाने ते लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नरला वळसा घालून माघारी आले. चौकात उभ्या असलेल्या देसाई यांच्यासमोर येऊन त्यांना आम्हाला का थांब म्हणत होतास, अशी एकेरी भाषा वापरून शिवीगाळ केली. यावेळी देसाई यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांची कॉलर धरून फिल्मी स्टाईलने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भर रस्त्यावर वृद्ध पोलिसाला मारहाण होत असलेली पाहून वाहनधारक व नागरिकांची गर्दी झाली. काही नागरिकांनी पुढे होत त्या तरुणांच्या तावडीतून देसाई यांची सुटका केली. त्यानंतर पळून जाणाऱ्या तरुणांना नागरिकांनी पकडले. यावेळी दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे दिसून आले. या प्रकाराची माहिती वायरलेसवरून शहर वाहतूक शाखेस व लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. काही क्षणांतच पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती देसाई व नागरिकांकडून घेतली. त्यानंतर त्या तरुणांना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आणले. याठिकाणी त्यांच्याकडे पोलिसी खाक्या दाखवित चौकशी केली असता त्यांनी नाव, पत्ता सांगितला. त्यांच्या विरोधात देसाई यांची फिर्याद घेऊन मारहाण, सरकारी कामात अडथळा या कलमाखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. संशयितांची रात्री सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणीही केली. या प्रकाराने वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. शिवी दिल्याने मारहाण साईदास शिंदे हा मार्केटिंगचा व्यवसाय करतो. आझाद चौक येथे त्याचे कार्यालय आहे. सकाळी तो कामानिमित्त शिराळ्याला गेला होता. दुपारी येऊन उद्यमनगर येथून मित्र प्रीतम शिंदे याला घेतले. त्यानंतर दारू ठोसून तेथून ते दुचाकीवरून लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नरमार्गे रविवार पेठेतील घरी निघाले असताना त्यांनी हा प्रकार केला. सहायक फौजदार देसाई यांनी आईवरून शिवी दिल्याने त्यांना आम्ही जाब विचारायला गेलो होतो. त्यावेळी आमच्यात धक्काबुक्की झाल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. या दोघांना अटक झाल्याचे समजताच दोघांचेही नातेवाईक लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आले. शहरात पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी होते. प्रत्येक सिग्नल चौकात एकटा पोलिस वाहतुकीवर नियंत्रण ठेवत शिस्त लावत असतो. अशावेळी एकटेपणाचा गैरफायदा घेत काही उद्धट लोक पोलिसाला दादागिरी व मारहाण करण्याचा प्रयत्न करतात. अलीकडे वाहनधारकांचे पोलिसांना अरेरावी करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यांची दादागिरी सहन केली जाणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. - आर. आर. पाटील, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा