शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

सहायक वनसंरक्षक परीक्षेत कसेकर प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:25 IST

कोल्हापूर : देवर्डे (ता. आजरा) येथील शेतकरी कुटुंबातील लक्ष्मण महादेव कसेकर याने सहायक वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक ...

कोल्हापूर : देवर्डे (ता. आजरा) येथील शेतकरी कुटुंबातील लक्ष्मण महादेव कसेकर याने सहायक वनसंरक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. अहमदनगरमधील रामदास विष्णू दौंड हे मागासवर्गीय प्रवर्गातून, तर महिला वर्गवारीमधून लातूर येथील प्रतीक्षा नानासाहेब काळे यांनी प्रथम क्रमांकाने यश मिळविले. राज्य लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी आॅनलाईन जाहीर झाला.‘एमपीएससी’कडून सहायक वनसंरक्षक (गट अ) १६ आणि वनक्षेत्रपाल (गट ब) ५३ पदांसाठी दि. २८ आॅक्टोबर २०१८ रोजीपरीक्षा घेण्यात आली. तिचाअंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. देवर्डे येथील विद्यामंदिरमध्ये लक्ष्मण कसेकर याचे प्राथमिक, तर आजरा हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. आजरा महाविद्यालयामधून बी. एस्सी. (स्टॅटिस्टिक्स) अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. सहायक वनसंरक्षकपदासाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या लेखी परीक्षेत त्याने यश मिळविले. मात्र, मुलाखतीसाठी तो पात्र ठरला नाही. त्यावर पुन्हा जोमाने तयारी सुरू केली. त्याच्या जोरावर या परीक्षेत ४५० पैकी २८२ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. मार्चमध्ये त्याने सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक मिळविला होता. लक्ष्मण हा सध्या कोल्हापुरातील प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये यूपीएससीची तयारी करीत आहे. त्याचे वडील लक्ष्मण आणि आई शोभा या शेती करतात. त्याला ए. बी. फौंडेशनचे दीपक अतिग्रे, ज्ञानदेव भोपळे यांचे मार्गदर्शन लाभले.दोन्ही भावांचे यशलक्ष्मण कसेकर याने सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेपाठोपाठ वनसेवेच्या परीक्षेत, तर त्याचे मोठे भाऊ रामचंद्र यांनी करसहायक पदाच्या परीक्षेत यश मिळविले आहे‘यूपीएससी’त यश मिळविण्याचे ध्येयसहायक वनसंरक्षक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याचा खूप आनंद होत आहे. या पदावर रुजू होणार आहे. माझ्या यशात कुटुंबाचा मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण याने व्यक्त केली. मोठा भाऊ रामचंद्र यांच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. स्वत:च्या नोटस्वर भर देत अभ्यास केला. मुलाखतीच्या तयारीसाठी ए. बी. फौंडेशनचे मार्गदर्शन लाभले. सध्या उपजिल्हाधिकारी पदासाठीच्या परीक्षेची तयारी सुरू आहे. ‘यूपीएससी’ परीक्षेत यश मिळविण्याचे ध्येय असल्याचे लक्ष्मण याने सांगितले.