कुरुकली येथे आ. पी. एन. पाटील सडोलीकर यांच्या सहकार्याने कोविड उपचार केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात ६३ बेड उपलब्ध केले आहेत. गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजनचीही सोय करण्यात आली आहे. सध्या या केंद्रात ५९ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित पाटील यांनी दिली. या केंद्राला भोगावती सहकारी साखर कारखान्याच्यावतीने औषधे, गोळ्या, सॅनिटायझरची मदत करण्यात आली. ही मदत कारखान्याचे संचालक डी. आय. पाटील, पांडूरंग पाटील, शिवाजीराव कारंडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कुरुकलीचे सरपंच रोहित पाटील, बेले ग्रामपंचायत सदस्य तानाजी आदिगरे, शिवाजी टिपुगडे, तुषार पाटील, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील उपस्थित होते.
फोटो ओळी : कुरुकली (ता. करवीर) येथील कोविड केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित पाटील यांच्याकडे औषधे सुपुर्द करताना कारखान्याचे संचालक डी. आय. पाटील, शिवाजीराव कारंडे, पांडूरंग पाटील आदी.