शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

धामणीवासीयांना आश्वासनांचे गाजरच

By admin | Updated: May 11, 2017 00:18 IST

धामणीवासीयांना आश्वासनांचे गाजरच

गेल्या २0 वर्षांच्या काळात सरकारे बदलली. मात्र, धामणीवासीयांच्या नशिबी केवळ आश्वासनांची गाजरेच आली. प्रकल्पस्थळासह धामणी खोऱ्यासही भग्नावस्था आली असून, राजकीय अनास्था यासाठी कारणीभूत आहे. श्रेयवादाचे राजकारण आणि धामणीवासीयांचे अज्ञान या सर्वांमुळेच प्रकल्पाचे काम रखडले आहे. त्याच वेध घेणारी मालिका ...महेश आठल्ये । लोकमत न्यूज नेटवर्कम्हासुर्ली : धामणी खोऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या धामणी मध्यम प्रकल्पाचे काम प्रशासकीय मान्यतेनंतरही २0 वर्षे अपूर्णावस्थेत आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी धामणीवासीयांनी दोन वेळा विराट मोर्चे काढले. दोनवेळा सुधारित प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रकल्पाची किंमत १२० कोटींवरून तब्बल ८०० कोटींवर पोहोचली. मात्र, आजही या प्रकल्पाचे काम रखडले असून पाणी टंचाईमुळे धामणीवासीयांची होरपळ कायम आहे. राधानगरी, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांत विभागलेल्या धामणी खोऱ्यात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, पिके पाण्यावाचून होरपळू लागली आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र, धामणी मध्यम प्रकल्पाचे काम गेली अकरा वर्षे सलगपणे बंद आहे. गेल्या आॅगस्टमध्ये या प्रकल्पाच्या सुधारित आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळाली व या ७८२ कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली. मात्र, याही वर्षी या प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात अत्यल्प तरतूद झाल्याने धामणीवासीयांच्या पदरात पुन्हा निराशा पडली आहे. वेळोवेळी केवळ आश्वासनांची गाजरे दाखवायची आणि राजकीय लाभ उठवायचा हेच प्रत्येक सरकारचे धोरण असल्याचे यावरून दिसते.३.८५ टीएमसी क्षमतेच्या धामणी मध्यम प्रकल्पास १९९९ ला मंजुरी मिळाली. मात्र, काम सुरू होण्यास २००० साल उजाडले. दरम्यानच्या काळात अनेकवेळा पुनर्वसनाचा प्रश्न, वनविभागाचा प्रश्न, निधीची कमतरता, आदी कारणांनी प्रकल्पाचे काम रखडले. वेळोवेळी यावर मार्ग काढून तत्कालीन लोकप्रतिनिधींनी काम सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. सन २०१० पासून या प्रकल्पाचे काम गेली सलग ११ वर्षे पूर्णपणे बंद आहे. परिणामी, प्रकल्पस्थळास भग्नावस्था आली आली आहे.गेली २0 वर्षे आम्ही प्रकल्पासाठी जमिनी दिल्या. मात्र, प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे भीषण पाणीटंचाई जाणवते. प्रकल्पग्रस्तांसह लाभधारक शेतकरी सरकारच्या धोरणामुळे देशोधडीला लागला आहे. - कृष्णात आरबुणे (अध्यक्ष, धामणी धरणग्रस्त संग्राम समिती)काही तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्पाचे काम थांबले आहे. त्यावर मार्ग काढणे सुरू असून, धामणी प्रकल्पाचे काम सुरू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी जबाबदार आहे.- आमदार प्रकाश आबिटकर