लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : कोरोनासारख्या जागतिक महामारीचा परिणाम नागरिकांवर होत आहे. या रोगापासून बचाव करण्यासाठी अष्टविनायक तरुण मंडळाने कोरोना प्रतिबंधक लस नागरिकांना उपलब्ध करून दिली. त्यांचे हे समाजकार्य कौतुकास्पद असून, त्यांनी धार्मिक सणातून सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी केले.
ते गारगोटी येथील शिवाजी नगरातील अष्टविनायक तरुण मंडळाने आयोजित केलेल्या लसीकरण मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन एत्नाळकर, आरोग्य विस्तार अधिकारी पी. ओ. पोवार, विजय सारंग, दिलीप कोरवी, भरत शेटके, राजू वडर, संजय वडर, शामराव वडर, अल्ताफ बागवान, पांडुरंग कांबळे, अमोल कलकुटकी, संतोष वडर, जावेद सय्यद यांच्यासह डॉक्टर्स, परिचारिका, आशा स्वयंसेविका यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ : गारगोटी येथील शिवाजी नगरमध्ये लसीकरणासाठी लस उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. सचिन यत्नाळकर यांचा सत्कार अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विजय सारंग, अमोल कलकुटकी, संतोष वडर आदी उपस्थित होते.