संत सद्गुरू बाळूमामांचे बकऱ्यांचे १६ बग्गे (कळप) असून, या बग्ग्यांमध्ये वालंग (ढोलवादन), बाळूमामांच्या जीवनावर आधारित ओवी गायन, भजन (हरिजागर) आदी कार्यक्रम झाले, तर बुधवारी (दि.२१) द्वादशीला सकाळी आरती झाल्यानंतर महाप्रसाद व पालखी सोहळ्याने सांगता होईल. महाराष्ट्रात सोळा ठिकाणी (कंसात जिल्हा) आषाढी एकादशी
नरवटवाडी (नांदेड), बादलेवाडी, कमलापूर, कुपसिंगी (सोलापूर), कोळगाव (अहमदनगर), आडगाव (यवतमाळ), अब्दुललाट (कोल्हापूर), आळसंद, आरग (सांगली), डोंबाळवाडी (पुणे), चापोली (लातूर), नंदापूर (जालना), गुढे (जळगाव) या ठिकाणी बकऱ्यांमध्ये साजरी झाली.
यावेळी प्रत्येक बग्ग्याचे कारभारी बापू हतनूरकर,
गुंडोपंत पाटील, यशवंत सुरण्णवर, अप्पा माळी, विष्णू गायकवाड, अनिल शिनगारे, विशाल सिद्ध, लहू गायके ,बाळू शिनगारे, सुबराव लवटे, काशीनाथ शिनगारे, पांडुरंग बंडगर, हालाप्पा सुराण्णवर, लकाप्पा दुरदुंडी, नागाप्पा मिरजे, राहुल वाघमोडे, तसेच प्रत्येक बग्ग्यात बकऱ्यांच्या सेवेसाठी असणारे मेंढके, हजारो भाविक उपस्थित होते.