शिरोळ : शिरोळ तालुका आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनने देशव्यापी संपामध्ये सहभाग घेऊन कामबंद आंदोलन केले. यावेळी मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना देण्यात आले. यावेळी आशा व गटप्रवर्तकांनी शुक्रवारी शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने केली. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास कोरोना लसीकरण यासह शासकीय कामावर बहिष्कार टाकू, असा इशारा दिला. यावेळी गटविकास अधिकारी कवितके यांनी आंदोलक व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना काळातील मानधन तसेच थकीत मानधनाबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. आंदोलनात जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील, उज्ज्वला पाटील, माया पाटील, संगीता पाटील, सुरय्या तेरदाळे, नीलम कोळी, प्राजक्ता कुलकर्णी, नौशाद मुजावर, मंदाकिनी लाड, सुभद्रा पोतदार, अश्विनी सुतार यांनी सहभाग घेतला.
फोटो - २४०९२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ येथे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना आशा वर्कर्स यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.