शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद जरंडीकर यांची अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:26 IST

पन्हाळा : येथील पन्हाळा एज्युकेशन सोसायटी, पन्हाळा या संस्थेच्या अध्यक्षपदी अरविंद भास्कर जरंडीकर यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. गिरीश ग. ...

पन्हाळा : येथील पन्हाळा एज्युकेशन सोसायटी, पन्हाळा या संस्थेच्या अध्यक्षपदी अरविंद भास्कर जरंडीकर यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. गिरीश ग. नानिवडेकर यांची निवड करण्यात आली. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. त्यामध्ये या निवडी करण्यात आल्या. संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब गुळवणी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर ज्येष्ठ सभासद व पन्हाळा विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक अरविंद भास्कर जरंडीकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी जरंडीकर यांचे नाव संचालक माधव गुळवणी यांनी सुचविले तर नानिवडेकर यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी संचालक एस. व्ही. इनामदार यांनी सुचविले. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी सर्व सभासदांनी एकमताने केल्या. सभेमध्ये संस्था अहवाल वाचन सचिव पी. ए. यज्ञोपवित यांनी केले. सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभेचे सर्व कामकाज खेळमेळीत पार पडले. सभेसाठी गव्हर्निंग कौन्सिलचे संचालक डॉ. बी. आर. कोरे, आर. के. कुलकर्णी तसेच सभासद पंडित भोसले, राजाभाऊ भालेकर उपस्थित होते. आभार आर. के. कुलकर्णी यांनी मानले.

फोटो : ०९ अरविंद जरंडीकर, ०९ गिरीश नानिवडेकर