शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

घोड्यावरून येऊन अरुणा माळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 19:12 IST

अनोख्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधत सजविलेल्या घोड्यावरून येऊन शक्तिप्रदर्शनाने वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार डॉ. अरुणा माळी यांनी बुधवारी दुपारी आपला

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडी : प्रचारयात्रेद्वारे शक्तिप्रदर्शन

कोल्हापूर : अनोख्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधत सजविलेल्या घोड्यावरून येऊन शक्तिप्रदर्शनाने वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार डॉ. अरुणा माळी यांनी बुधवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उन्हाचा प्रचंड तडाखा असूनही हातात पक्षाचे निळ्या रंगाचे झेंडे खांद्यावर घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. हलगीचा कडकडाट, कैताळ व घुमक्याच्या वाद्यात ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली.

बिंदू चौकात महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचारयात्रेला प्रारंभ झाला. पिवळा फेटा, नऊवारी भगवी साडी नेसून हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली भारताची राज्यघटना हातात घेऊन उमेदवार डॉ. अरुणा माळी ह्या घोड्यावर स्वार होऊन प्रचारयात्रेत सहभागी झाल्या होत्या. कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी, डॉ. प्रकाश आंबेडकर व अरुणा माळी यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. यावेळी प्रचारप्रमुख डॉ. उदयसिंह देसाई, महिला आघाडीप्रमुख अस्मिता दिघे, डॉ. रेश्मा चव्हाण, डॉ. दीपाली जाधव, आदी सहभागी झाले होते.डॉ. अरुणा माळी यांनी माजी आमदार लक्ष्मण माने, आघाडीचे जिल्हाध्यक्ष अस्लम मुल्ला, सरचिटणीस शाहीर शेख, लिंगायत मोर्चाचे अध्यक्ष सुनील गोटखिंडे, इम्रान सनदी यांच्यासोबत जाऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.