शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘कलातपस्वीं’चा जीवनपट उलगडला

By admin | Updated: October 31, 2014 01:09 IST

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती : चंद्रकांत जोशी यांच्या सत्तरी पूर्णत्वाची सायंकाळ रंगली

कोल्हापूर : ‘मळकट भिंतीवरती चित्रकशाचे काढू,पांढऱ्या खडूच्या रेषी स्वत:लाच पाहू,प्रकाश पाहण्यासाठी सावलीतराहू की, प्रकाश पांघरण्याकाळवंडून जाऊ’,असे जीवनगीत घेऊन कला, चित्रपट क्षेत्रात आयुष्य व्यतीत करणाऱ्या कलातपस्वी दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांचा जीवनपट आज, गुरुवारी आठवणींतून उलगडला. निमित्तं होतं... दिग्दर्शक जोशी यांच्या वयाची सत्तरी पूर्णत्वाच्या सोहळ्याचं.चंदू, दादा, काका, मामा, सर, आजोबा या आणि अशा कैक रूपांत अनेकांच्या आयुष्यात कार्यरत असलेल्या दिग्दर्शक जोशी यांचा सोहळा त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, शिष्य आणि मित्र परिवाराने आयोजित केला होता. अक्षता मंगल कार्यालयातील या सोहळ्यास ‘लोकमत’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर, चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, अशोक राणे, चित्रकार रवी परांजपे, श्यामकांत जाधव, साहित्यिक राजन खान, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, उद्योगपती व्ही. बी. पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.वेदपठणाने जोशी यांच्या सत्तरी पूर्णत्वाच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर जोशी व त्यांच्या पत्नी मंगल यांचे त्यांची मुलगी संगीता, सून सोनाली, वैशाली, नीता आणि पुतणी मुग्धा, पूर्वा व नात गार्गी यांनी औक्षण केले. त्यानंतर लघुपटातून जोशी यांच्या जीवनाची झलक उपस्थितांना घडविली. आंशुमन, नचिकेत, ऋतूपर्णा, अन्वय, शार्दुल या नातवंडांनी छोट्याशा नाटिकेतून आजोबांचा वारसा दाखवून दिला. पल्लवी कुलकर्णी, अजय पूरकर, आदींनी गायनातून सोहळ्यात रंग भरला. वैभव जोशी यांनी काव्यातून शुभेच्छा दिल्या. कुटुंबिय, नातेवाईक, शिष्य आणि मित्रपरिवाराने छोट्या-छोट्या आठवणींतून जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे दर्शन घडविले. शिवाय त्यांचा जीवनपट देखील उलगडला. कार्यक्रमास अनंत कुलकर्णी, अनिरुद्ध जोशी, गोपाळराव जोशी, पोतदार, अनंत खासबारदार,शिरीष खांडेकर, सागर बगाडे, दिलीप बापट, सुभाष भुर्के, अजेय दळवी, पवन खेबुडकर, आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ऋषिकेश जोशी यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)