मलकापूर : मलकापूर परिसरात पारंपरिक वाद्याच्या गजरात घरगुती गणपतीचे आगमन झाले. दिवसभर मलकापूर बाजारपेठेत सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती .
गणेशोत्सवावर कोरोनाच्या प्रादुर्भावाचे सावट जाणवते. मलकापुरातील कुंभारवाड्यात गणेशमूर्ती नेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे होणारी गर्दी झाली नाही. नऊ वाजलेनंतर घरगुती गणेशमूर्ती नेण्यात आली. मोटारसायकल, कारमधून मूर्ती नेण्यात आल्या. यावेळी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात आला. दोन दिवस मलकापूर बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळानी टॅक्टरातून गणेशमूर्ती नेण्यात आल्या. पोलिसांनी मलकापुरात बंदोबस्त ठेवला होता. प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थी सणाला असणारा उत्साह जाणवत नव्हता. कोरोनाचे सावट दिसत होते.