शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चॅटिंगची तक्रार देण्याची धमकी देण्याऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:20 IST

कुरुंदवाड : फेसबुकवर मैत्रीचा गैरफायदा घेऊन मोबाईलवर अश्लील चॅटिंग केल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन ३ लाख २५ ...

कुरुंदवाड : फेसबुकवर मैत्रीचा गैरफायदा घेऊन मोबाईलवर अश्लील चॅटिंग केल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन ३ लाख २५ हजाराचा गंडा घालून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागराज शंकर दैवज्ञ (रा. कबनूर, ता. शिगाव, जि. हावेरी) याला कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली. त्याला येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबतची तक्रार अमोल रावसोा लठ्ठे (रा. घोसरवाड, ता. शिरोळ) याने कुरुंदवाड पोलिसांत दिली.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार लठ्ठे याची सप्टेंबरमध्ये नागराज दैवज्ञ याच्या ‘राणी’ या नावाने फेसबुक अकौंटवर मैत्री झाली. दोघांचे मोबाईलवर अश्लील चॅटिंग होत एकमेकांशी बोलणे सुरु झाले. या अश्लील चॅटिंगचा गैरफायदा घेऊन ‘तू माझ्याशी चॅटिंग करून फोटो टाकला आहेस, तुझी दिल्लीत तक्रार करतो’, अशी धमकी देत प्रथम दीड लाखाची मागणी केली. तक्रारीच्या भीतीने लठ्ठे गूगल पेजवरुन दैवज्ञला दीड लाखाची रक्कम दिली. त्यानंतर ८ डिसेंबरला संशयित आरोपीने पुन्हा फोन करुन लठ्ठेकडे १ लाख ७५ हजाराची मागणी केली. अशी एकूण ३ लाख २५ हजार रुपयांची रक्कम संशयित दैवज्ञ यास गूगल पे केली. त्यानंतर आरोपीने पुन्हा मोबाईलवरील अश्लील चॅटिंग मेसेज परत करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यासाठी पैसे घेऊन कोल्हापुरात येण्यास सांगितले.

वारंवार भीती घालून खंडणी वसूल करत असल्याने लठ्ठे याने वैतागून कुरुंदवाड पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी दैवज्ञ याला कोल्हापुरातील डी मार्ट परिसरात अटक केली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार चव्हाण करीत आहेत.

फोटो - २५१२२०२०-जेएवाय-०५-संशयीत नागराज दैवज्ञ