शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरीतील विस्तार अधिकाऱ्यास अटक

By admin | Updated: April 17, 2016 00:42 IST

पेपरफुटी प्रकरण : संजय कांबळेच्या हरिपूर येथील घरावर छापा

सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका पदाच्या पेपरफुटीप्रकरणी शनिवारी रात्री सांगली पोलिसांनी राधानगरी (जि. कोल्हापूर) येथील पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी अभिजित आनंदराव पाटील (वय २८, रा. राधानगरी) यास अटक केली आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या संजय कांबळे याच्या हरिपूर (ता. मिरज) येथील घरावर छापा टाकून झडती घेतली. सहा महिन्यांपूर्वी पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आले होते. गेल्या आठवड्यात कवलापूर (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक संजय कांबळे (रा. हरिपूर) व राधानगरी पंचायत समितीतील कंत्राटी डाटा आॅपरेटर विकास फराकटे (रा. फराकटेवाडी, ता. राधानगरी) यांच्यासह चौघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत अभिजित पाटील याचे नाव निष्पन्न झाले होते. पाटील हा अटकेतील फराकटेचा मावसभाऊ आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील एका कर्मचाऱ्याने हा पेपर फोडून प्रथम फराकटेला दिला होता. फराकटेने पुढे हा पेपर पाटीलला दिला होता. त्यानंतर त्याने उमेदवारांना संपर्क साधून हा पेपर पुरविल्याचे निष्पन्न झाले. पाटीलच्या शोधासाठी सांगली पोलिसांनी शुक्रवारी राधानगरीला येथील त्याच्या घरावर छापा टाकला असता तो सापडला नाही. शनिवारी त्यास अटक केले. त्याला घेऊन रात्री उशिरा पथक सांगलीत दाखल झाले. त्याला उद्या (रविवारी) न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) दोन ‘डझन’ संशयित पेपरफुटीच्या प्रकरणात आतापर्यंत दोन ‘डझन’ संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. या सर्वांना अटकही झाली आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.