शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

जागतिक दुग्ध दिनी गोकूळकडून रुग्णांना सुगंधी दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:18 IST

कोल्हापूर : जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून गोकुळ दूध संघामुळे मंगळवारी सीपीआर, सेवा रुग्णालय व आयसोलेशन या सार्वजनिक रुग्णालयातील ...

कोल्हापूर : जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून गोकुळ दूध संघामुळे मंगळवारी सीपीआर, सेवा रुग्णालय व आयसोलेशन या सार्वजनिक रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांनी सुगंधी दूधाचा आस्वाद घेतला. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखालील गोकुळच्या टीमने एक हजार पाकिटे वाटली.

यावेळी बोल‍ताना अध्यक्ष पाटील यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या या काळात शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी पौष्टिक आहार म्हणून दूधाचा समावेशाची गरज व्यक्त केली. उत्तम आरोग्यासाठी उत्तम गुणवत्तेचे दूध आहारात वापरा, असे आवाहनही त्यांनी केले. या उपक्रमात सीपीआरचे अधीक्षक डॉ. सत्यवान मोरे, सेवा हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. उमेश कदम,आयसोलेशन हॉस्पिटलचे डॉ. रमेश जाधव, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, अभिजित तायशेटे, एस. आर. पाटील, बयाजी शेळके, मार्केटिंग अधिकारी उपेंद्र चव्‍हाण, लक्ष्‍मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील सीपीआरचे बंटी सावंत अभिषेक डोंगळे, राजवीर नरके यांनी सहभाग घेतला.

फोटो: ०१०६२०२१-कोल-गोकुळ दूध

फोटो ओळ: जागतिक दूग्ध दिनाचे औचित्य साधून मंगळवारी गोकुळ दूध संघाकडून सीपीआरमध्ये अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले.