शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

उद्यापासून सैन्यभरती

By admin | Updated: February 2, 2016 01:01 IST

सुभाष सासने : तालुकानिहाय प्रक्रिया; ५७ हजार जणांची नोंदणी

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सहा व गोव्यांतील दोन जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांसाठी कोल्हापुरात उद्या, बुधवारपासून सैन्यदलातील विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. सैन्यभरती कार्यालयाने या प्रक्रियेचे आयोजन केले आहे. शिवाजी विद्यापीठातील क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात २० फेब्रुवारीपर्यंत भरतीची प्रक्रिया चालणार आहे. यासाठी सुमारे ५७ हजार जण उपस्थित राहतील. गोंधळ होऊ नये तसेच उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी यावेळी पहिल्यांदाच तालुकानिहाय भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. भरती प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी दिली. मेजर सासने म्हणाले, भरती प्रक्रियेचे नियोजन जिल्हा सैनिक कार्यालय व सैन्यभरती कार्यालयातर्फे केले आहे. सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर क्लार्क, स्टोअरकिपर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, सोल्जर ट्रेडस्मन पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी १९ जानेवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यातील सुमारे ५७ हजार पात्र उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होतील. त्यात प्रवेशपत्र (अ‍ॅडमिट कार्ड) असलेल्या उमेदवारांनाच प्रवेश दिला जाईल. या कार्डवर नमूद केल्यादिवशी आणि वेळेत भरतीसाठी प्रवेशपत्राच्या प्रिंटसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. उद्या, बुधवारपासून भरतीची प्रक्रिया सुरू होईल. यासाठीची वजन, उंची आणि कागदपत्रांच्या तपासणीची प्रक्रिया आज, मंगळवारी रात्री बारापासून सुरू होईल. सकाळी पाच वाजता पहिली बॅच धावण्याच्या प्रक्रियेत सहभागी होईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी आदी प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. या प्रक्रियेसाठी शिवाजी विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आदींचे सहकार्य मिळाले आहे. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना जीवनमुक्ती संस्था व व्हाईट आर्मीतर्फे विनामूल्य जेवण दिले जाणार आहे. दरम्यान, भरती प्रक्रियेसाठी तंबू उभारणी, बॅरेकेटस् लावणे, विजेची सुविधा आदी कामकाज सोमवारी सुरू होते.