शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

सेना आक्रमक; भाजप घायाळ

By admin | Updated: October 20, 2015 23:47 IST

प्रचार तापला : कोल्हापूर मनपा निवडणूक

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणूक रणांगणात उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा प्रचारातील जोर वाढला आहे. अद्यापही वैयक्तिक गाठीभेटी, बैठका यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला जात आहे. सध्या आक्रमक भूमिकेत असणाऱ्या शिवसेनेच्या वाघांनी आरोप लगावण्यात आघाडी घेतली असून, परिणामी भाजपचे नेते पुरते घायाळ झाले आहेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील प्रचाराने गती घेतली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांच्या घरांपर्यंत पोहोचण्यावर व आपली भूमिका मांडण्यावर सर्वाधिक जोर आहे. प्रचारात रंगत भरत चालली असल्याने शहरातील वातावरण पूर्णपणे निवडणूकमय झाले आहे. महापालिका निवडणुकीत युती करण्याचे पहिल्यापासून टाळल्यामुळे शिवसेनेचा भाजपविरुद्धचा संताप चांगलाच वाढला आहे. त्यामुळे सेनेचे नेते आक्रमक भूमिकेत दिसतात. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार नीलम गोऱ्हे, आमदार राजेश क्षीरसागर यांनी मटक्यासह अन्य अवैध धंद्यांशी संबंध असलेल्यांना उमेदवारी दिल्याचा भाजपवर थेट आरोप लगावला. सेनेच्या आरोपांमुळे भाजपचे नेते घायाळ झाले आहेत. दसऱ्यानंतर तोफा धडाडणार बहुतेक सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा दसरा झाल्यानंतर म्हणजेच शुक्रवार (दि. २३) नंतर होणार आहेत. कॉँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पतंगराव कदम, रमेश बागवे, आमदार प्रणिती शिंदे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या तोफा धडाडणार आहेत. भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २८ किंवा २९ आॅक्टोबर रोजी कोल्हापुरात येणार आहेत. त्यांच्याशिवाय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सभा होणार आहेत.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व मंत्री रामदास कदम, आदी नेतेही येणार आहेत. त्यामुळे पुढील आठवडा आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजणार आहे.