शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अरबी समुद्राच्या साक्षीने अवकाशात ‘रेशीमगाठी’

By admin | Updated: January 3, 2016 00:48 IST

सातारच्या जोडप्याचा अनोखा सोहळा : दापोलीतील मुरूड समुद्रकिनारी पॅरासेलिंगवर साखरपुडा

दापोली : आपला साखरपुडा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण व्हावा, या हेतूने साताऱ्यातील नवजोडप्याने चक्क अरबी समुद्रात १00 फूट उंच अवकाशात एकमेकांच्या हातात अंगठ्या घालून साखरपुडा केला. सातारा जिल्ह्यातील मनाली वाळिंबे व रोहन कुलकर्णी या तरूणांनी हा क्षण केवळ आपल्याच नाही तर अनेकांच्या लक्षात राहील, अशा पद्धतीने साजरा केला. दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी रंगलेला हा अनोखा सोहळा शनिवारी दिवसभर चर्चेचा विषय झाला होता. दापोली तालुक्यातील पर्यटनाचे दिवसेंदिवस आकर्षण वाढू लागले आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्याची पर्यटकांना भुरळच पडली आहे. समुद्रकिनाऱ्यावरील पॅराग्लायडींग, वॉटर स्पोर्टस्, विविध खेळांचे आकर्षण आहे. त्याचबरोबर समुद्रातील पॅरासेलींग बोटीवरील पॅराशूटने उंच उंच भरारी घेण्याची हौसही अनेकांना आवरता येत नाही. समुद्राच्या या आकर्षणामुळे साताऱ्यातील तरुण जोडप्याने चक्क समुद्रातील पॅरासेलींगवर अनोखा साखरपुडा केला. पुणे येथे महिंद्रा कंपनीत इंजिनिअर असलेल्या रोहन कुलकर्णी यांनी भावी पत्नी मीनल वाळिंबे हिच्याशी मुरुड समुद्रकिनारी पॅरासेलींग करत साखरपुडा केला. मीनलचे वडील श्रीपाद वाळिंबे सातारा येथे दूरसंचार खात्यात आहेत. या साखरपुड्यासाठी वाळिंबे व कुलकर्णी कुुटुंबीय शुक्रवारी सायंकाळी मुरुड येथे दाखल झाले होते. शनिवारी सकाळी १०.३० वाजता वैदिक पद्धतीने पूजा झाल्यानंतर समुद्रातील पॅरासिलींग बोटीवर जाऊन दोघांनी एकत्र पॅराशूटच्या सहाय्याने उंच उंच भरारी घेत एकमेकांना साखरपुड्याची अंगठी घालून साखरपुडा केला. (प्रतिनिधी) १00 फुटांवर साखरपुडा हा साखरपुडा १00 फूट उंचीवर झाला. बोटीला १00 फुटांची दोरी होती आणि ती पूर्णपणे हवेत सोडण्यात आली होती. त्यामुळे हा साखरपुडा त्या जोडप्याबरोबरच किनाऱ्यावर आलेले पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थांसाठीही अविस्मरणीय असा ठरला. मुरुडचा समुद्रकिनारा आपल्याला खूपच भावला. त्यामुळे या बीचवर पॅरासेलींग बोटीवर साखरपुडा करण्याची इच्छा मनात आली. मुरुड किनाऱ्याच्या आकर्षणापोटीच या ठिकाणी साखरपुडा करण्याचे ठरवले. या अनोख्या कार्यक्रमाला दोन्ही कुटुंबियांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानेच अरबी समुद्रात साखरपुडा होऊ शकला. - मनाली वाळिंबे सुखी संसाराची सुरुवात चांगल्या उपक्रमाने सुरुवात व्हावी म्हणून या ठिकाणी साखरपुडा केला. पॅराशूटवर बसताना वेगळा अनुभव मिळाला. दोघांनी एकत्र उंच भरारी घेऊन साजरा केलेला साखरपुडा आयुष्यातील खूप आनंदचा क्षण होता. पॅरासेलींगची सुरुवातीला भीती वाटली. परंतु आम्ही दोघं एकत्र असल्याने ती भीती दूर झाली.