शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

अपंगांसाठी ४ एप्रिलला दिल्ली येथे धडक देणार

By admin | Updated: February 15, 2016 01:11 IST

बच्चू कडू : प्रहार अपंग क्रांती आंदोलन निर्धार मेळावा

कोल्हापूर : अपंग बांधवांच्या मागण्यांसाठी येत्या चार एप्रिलला दिल्लीत आंदोलन करणार आहे. राज्य सरकारने अपंगांसाठी कल्याणकारी निर्णय घ्यावेत, असे प्रतिपादन आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले. येथील प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या निर्धार मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कणेरीमठाचे प.पू.श्री मुपिन काडसिद्धेश्वर महाराज, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद उपस्थित होते. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या सभागृहात हा मेळावा झाला.बच्चू कडू म्हणाले, सन १९९५च्या अपंगांच्या कायद्याची अंमलबजावणी सन २०१६ ला झाली. राज्यात सुमारे ४० लाख अपंग बांधव आहेत; पण आतापर्यंत आॅनलाईन दाखले केवळ २० हजार अपंगांना मिळाले आहेत. सरकारकडून केवळ दोनशे रुपयांची तुटपुंजी मदत मिळते. सरकारने आदिवासी, दलित, मागासवर्गीय अपंगांसाठी काम केले पाहिजे. अपंगांच्या आंदोलनांमुळे आता सरपंचांपासून ते आमदारापर्यंत सर्वजण दखल घेत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. त्याचबरोबर समाजातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटना याही अपंगांसाठी कार्य करतात. सरकारने प्रथमच अपंगांसाठी विनाअट घरकुल योजना सुरू केली. अपंगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आता चार एप्रिलला दिल्लीत आंदोलन करणार आहे.प.पू.श्री मुपिन काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले, राष्ट्रासाठी सर्वांनी काम करावे. भविष्यात आपण एक नंबर होऊया असा संकल्प करावा. अविनाश सुभेदार म्हणाले, बच्चू कडू यांची आंदोलने सरकारला दखल घेण्यासारखी असतात. त्यांचे कार्य अपंगांसाठी उल्लेखनीय आहे. डॉ. रामानंद म्हणाले, सीपीआरमध्ये अपंग बांधवांसाठी आॅनलाईन दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याप्रसंगी अपंग बांधवांना चादरी तर राजारामपुरीतील बाबासाहेब सामंत बालमंदिरच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले.स्वागत अ‍ॅड. बी. जी. चौगुले यांनी, तर जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमर तनवाणी, दिगंबर कुतेकर, सदाशिव शेटे, नगरसेवक शारंगधर देशमुख, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, प्रशांत म्हेतर, सुरेश ढेरे, शैलेश सातपुते, रूपाली पाटील, कल्पना वावरे, उज्ज्वला चव्हाण, वैष्णवी सुतार, विजय शिंदे यांच्यासह अपंग बांधव उपस्थित होते. कार्याध्यक्ष विकास चौगुले यांनी आभार मानले.