शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाला मंजुरी

By admin | Updated: February 26, 2016 00:15 IST

रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा : २७५० कोटींच्या खर्चाला मान्यतारत्नागिरी

रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा : २७५० कोटींच्या खर्चाला मान्यतारत्नागिरी : वैभववाडी-कोल्हापूर या १०७.६५३ किलोमीटर लांबीच्या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाला केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. साडेचार वर्षांच्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश असलेल्या या मार्गाच्या उभारणीसाठी ३४५६ कोटी खर्च येणार आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात लोटे येथे ३०० कोटी खर्चाचा रेल्वेचे स्पेअर पार्टस बनविणारा कारखाना सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती कोकण रेल्वेचे रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक बाळासाहेब निकम यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू कोकणचे असल्याने कोकण रेल्वेला ते काय देणार, याबाबत कोकणवासीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यानुसार वैभववाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) ते कोल्हापूर या कोकणला कोल्हापूरशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. एकूण ३४५६ कोटी खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी २७५० कोटींच्या खर्चाला रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित निधी हा राज्य सरकारने उभारावयाचा आहे. या रेल्वेमार्गाचे तपशीलवार सर्वेक्षण झाले असून, त्याचा अहवाल केंद्राला सादर झाला आहे. या मार्गासाठी ६८३.६ हेक्टर जागा लागणार आहे. यावेळी निकम यांनी कोकण रेल्वेच्या अन्य प्रकल्पांबाबतही प्रसारमाध्यमांना माहिती दिली. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार पनवेलपासून रोहापर्यंत दुपदरीकरण कामाच्या निविदाही काढण्यात आलेल्या आहेत. रेल्वेमार्ग विद्युतीकरणाचे काम मंगलोर ते वेरना व वेरना ते रोहा असे दोन टप्प्यात होणार आहे. या कामासाठी जीवन विमा निगमने रेल्वेला २५० कोटींचे अर्थसाहाय्य केले आहे. विद्युतीकरणाच्या कामासाठी वर्षाला सुमारे ५० ते ० कोटी रुपये लागणार आहेत. २७ बोगदे, २५ मोठे पूल वैभववाडी- कोल्हापूर या नवीन मार्गावर १० रेल्वे स्थानके, २७ ठिकाणी बोगदे उभारले जाणार आहेत. त्यातील सर्वांत मोठा रेल्वे बोगदा हा ३.९६ किलोमीटर लांबीचा असेल. दोन किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे तीन, दोन किलोमीटर्सपेक्षा कमी लांबीचे २४ बोगदे आहेत. २५ मोठे पूल, नदी, नाल्यांवरील ७४ छोेटे पूल, ६८ रोड अंडर ब्रीज, ५५ रोड ओव्हर ब्रीज यांचा समावेश आहे. रेल्वेचा स्पेअर पार्टस्चा कारखाना लोटेत रत्नागिरी जिल्ह्यात ३०० कोटी रुपये खर्चातून रोलिंग स्टॉक कंपोनंट फॅक्टरी उभारण्यासही अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी लोटेतील जागेची शिफारस करण्यात आली आहे. विजयदुर्ग बंदर जोडणार ? वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली आहे. भविष्यात हा मार्ग वैभववाडी येथून विजयदुर्गपर्यंत विस्तारित केला जाऊ शकतो. त्याद्वारे विजयदुर्ग बंदर जोडले जाऊ शकते. तेथे रिफायनरी प्रकल्प उभारण्याबाबत चर्चा सुरू आहे. कोकण रेल्वेची सारथी सेवा आता देशभरात... कोकण रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविलेल्या सारथी सेवेची आता देशभरातील रेल्वेत अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याचा समावेश या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. रेल्वेने येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी गाडीतून उतरण्याआधी एसएमएसद्वारे कोणत्या स्थानकावर उतरणार याचा संदेश पाठविल्यानंतर त्यांना कुली उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही सेवा मोफत दिली जाणार आहे. शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी ई-तिकीट बुकिंग सेवाही सुरू केली जाणार आहे.