शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योग समितीच्या शिफारशींना मान्यता

By admin | Updated: April 14, 2016 00:02 IST

सुरेश हाळवणकर : नवीन उद्योग घटकांना २५ ते ३५ टक्के अनुदान

इचलकरंजी : वस्त्रोद्योग वाढीसाठी उपाययोजना सूचविण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व खात्यांच्या उपसचिवांची एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने सरकारला शिफारशी केल्या होत्या. त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.यामध्ये यंत्रमाग उद्योगाला स्वतंत्र वर्गवारी व सवलतीच्या दरात विद्युतपुरवठा, फॅक्टरी अ‍ॅक्ट कायद्यातील कामगारांच्या संख्येत वाढ, कापूस उत्पादक जिल्ह्यामध्ये जादा सवलती व अनुदान देणे, आॅटोलूमबरोबरच निटींग, गारमेंट, जिनिंग, प्रोसेसिंग, टेक्निकल टेक्स्टाईल आणि कॉम्पोझिट युनिट या सर्व प्रकारच्या उद्योगाला क्लिष्ठ प्रकारच्या व्याज अनुदान योजनेऐवजी उद्योग विभागाच्या धर्तीवर २५ ते ३५ टक्के भांडवली अनुदान देणे, याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. तसेच प्रायोगिक तत्त्वावर इचलकरंजी आणि सोलापूर येथे इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क एका महिन्यात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश प्राप्त झाले.प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी सुलभ पद्धतीने वरील सर्व प्रकारच्या वस्त्रोद्योगातील उद्योग घटकांना कर्जाच्या मर्यादेत शासन निर्णयाच्या दिनांकापासून व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान योजना लागू करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या टफ योजनेंतर्गत १० टक्के आणि १५ टक्के अनुदान वेगळे असणार आहे. मंत्रिमंडळाने दिलेल्या भांडवली अनुदानाची मंजुरी बँकेमार्फत नागपूर संचालक व वस्त्रोद्योग विभागाकडून एकाचवेळी अनुदान मंजुरी प्रदान करण्यात येईल व सलग सात हप्त्यांमध्ये ३१ मार्चपूर्वी दरवर्षी आॅनलाईन पद्धतीने जमा करण्यात येईल. तसेच यापूर्वी ज्या घटकांनी व्याज अनुदान योजनेमध्ये प्रस्ताव सादर केले आहेत, त्यांना व्याज अनुदान योजनेंतर्गतचे अनुदान दरवर्षी मिळेलच; पण आजपासून स्थापन होणाऱ्या नवीन उद्योग घटकांसाठी ही योजना लागू असेल. त्यामुळे दलाल, मध्यस्थ व योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना आळा बसणार असून, ७ वर्षे उद्योग चालविण्याची अट या प्रोत्साहन अनुदान योजनेत असेल. (वार्ताहर) भांडवली अनुदान योजना अशीगारमेंट, जिनिंग, प्रोसेसिंग, सूतगिरणी ३५ टक्के, टेक्निकल टेक्स्टाईल व कंपोझिट (कापसापासून कापडापर्यंत एकत्रित उद्योग) एकत्रित उद्योग ३० टक्के, अ‍ॅटोलूम, रॅपियर लूम, एअरजेट लूम, निटींग लूम, सायझिंग, टेपलूम, शटललेस लूम (टफ अंतर्गत मान्यता असलेले सर्व प्रकराचे लूम) २५ टक्के असे प्रोत्साहन अनुदान देण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.