शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘शाहू मेडिकल’साठी ८० कोटी मंजूर

By admin | Updated: May 3, 2016 01:00 IST

यापैकी ४० कोटी रुपये पावसाळी अधिवेशनात व उर्वरित ४० कोटी पुढील आर्थिक वर्षात वितरीत करण्याचे आदेश वित्तमंत्र्यांनी दिले.

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रकल्पासाठी वित्त विभागाकडून ८० कोटींचा निधी सोमवारी मंजूर करण्यात आला. त्यातील पहिल्या टप्प्यातील ४० कोटी रुपये पावसाळी अधिवेशनात मिळणार आहेत. त्यामुळे निधीअभावी महाविद्यालयाच्या रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना गती मिळणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक घेऊन निधीचा प्रश्न मार्गी लावला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापुरात सन २००१ मध्ये सुरू झाले. या महाविद्यालयाचे शेंडा पार्क$ येथील ३९.२१ एकर जागेमध्ये प्रथम वर्षाचे वर्ग सुरू झाले. दुसऱ्या वर्षाच्या इमारतीसाठी आतापर्यंत १३ कोटी रुपये खर्च करून दोन इमारतींमध्ये पॅथॉलॉजी, मायक्रो बायॉलॉजी, पी. एस. एम. व औषधशास्त्र हे विभाग तयार झाले. मात्र, दुसऱ्या वर्षाचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ८० कोटी निधीची आवश्यकता होती. सन २००९ पासून या टप्प्यासाठीचा निधी शासनदरबारी प्रलंबित होता. याबाबत सोमवारी वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्यासमवेत पालकमंत्री पाटील व आमदार महाडिक यांनी बैठक घेतली. त्यात ८० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यापैकी ४० कोटी रुपये पावसाळी अधिवेशनात व उर्वरित ४० कोटी पुढील आर्थिक वर्षात वितरीत करण्याचे आदेश वित्तमंत्र्यांनी दिले.बैठकीस महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, एस. एस. साळोखे, आर. एस. पाटील, बी. एम. उगले आदी उपस्थित होते. दरम्यान, याबाबत अधिष्ठाता रामानंद यांनी सांगितले की, शासनदरबारी प्रलंबित असलेल्या निधीबाबत पाठपुरावा करून तो मंजूर करण्याचे आश्वासने पालकमंत्री पाटील, आमदार महाडिक यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी वित्तमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणून यातून निधीचा प्रश्न मार्गी लावला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे महाविद्यालयातील दुसऱ्या टप्प्यातील कामांना गती मिळणार आहे. (प्रतिनिधी)दुसऱ्या टप्प्यात पॅथॉलॉजी व मायक्रो बायोलॉजी व्याख्यान कक्ष (१० कोटी ५९ लाख), मुलांसाठी दोन वसतिगृह (१३ कोटी ७२ लाख), मुलींसाठी दोन वसतिगृह (१३ कोटी ७२ लाख), ग्रंथालय इमारत (१३ कोटी ५१ लाख), आॅडिटोरियम हॉल (११ कोटी ६ लाख ), ओपीडी विभागाची इमारत (९ कोटी), परिचारिका वसतिगृह इमारत (१९ कोटी ७३ लाख), शल्य चिकित्साशास्त्र, अस्थी व्यंगोपचारशास्त्र व इतर विभागांच्या इमारती (३० कोटी ३२ लाख), पाच विषयांसह फॉरेन्सिक विभाग, ८६८ खाटांच्या हॉस्पिटलची इमारत, आदी कामांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे. कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित निधीबाबत मुंबईमध्ये सोमवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक आदी उपस्थित होते.