शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

नाट्यगृह बांधकामास मंजुरी

By admin | Updated: November 5, 2015 23:53 IST

गडहिंग्लज पालिका सभा : ‘बाजार समिती’वर खणगावे यांना संधी

गडहिंग्लज : डॉक्टर कॉलनीतील मुलींच्या हायस्कूलनजीकच्या खुल्या जागेत तीन कोटी ३० लाखांचे सांस्कृतिक केंद्र, वाचनालय इमारत या बहुउद्देशीय नाट्यगृहाच्या बांधकामास नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेश बोरगावे होते. नगरपालिकेने सुसज्ज व अद्ययावत नाट्यगृह बांधावे, अशी नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. त्यामुळेच बहुउद्देशीय नाट्यगृह बांधण्याचा निर्णय सभागृहात झाला.गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हूणून बसवराज खणगावे यांना नगरपालिका प्रतिनिधी म्हणून पाठवावे, अशी सूचना नरेंद्र भद्रापूर यांनी मांडली. त्यास नितीन देसाई यांनी अनुमोदन दिले.रजनीगंधा चौकातील महालक्ष्मी स्वीट मार्टनजीक पोलीस चौकी सुरू करावी, अशी सूचना हारुण सय्यद यांनी केली. मात्र, त्यामुळे वाहतुकीस अडथळा होणार असल्यामुळे साने गुरुजी वाचनालयानजीक पोलीस चौकीसाठी जागा देण्यास मान्यता दिली. दिवाळीत फळविक्रेत्यांना पूर्वीच्या ठिकाणीच बसू द्यावे, अशी सूचनाही सय्यद यांनी केली. त्यावेळी सभागृहात एक आणि बाहेर एक अशी भूमिका नको, असा टोला भद्रापूर यांनी हाणला. याबाबत दिवाळीनंतर ठोस भूमिका घेऊया, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.इराणी वसाहतीत फिरते शौचालय उपलब्ध करून देण्याची सूचना प्रा. स्वाती कोरी यांनी केली. यावर शौचालय खरेदीला त्यांनी घेतलेल्या आक्षेपाची आठवण लक्ष्मी घुगरे यांनी करून दिली. यावर कोरी म्हणाल्या, १३ व्या वित्त आयोगातून शौचालय खरेदीस आपण आक्षेप घेतला होता. इराणी झोपडपट्टीत शौचालय बांधणे आवश्यक आहे. मात्र, त्यांच्या अतिक्रमणास गांधीनगर नागरिकांचा विरोध असल्यामुळे तिथे पक्की शौचालये बांधू नयेत. त्यामुळेच तिथे फिरत्या शौचालयांचा उपयोग करावा.उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांनी पथदिव्यांच्या निविदेतील दरपत्रकास हरकत घेतली. कच्ची पावती दाखवू नका, बाजारभावापेक्षा कमी व शासनाने प्रमाणित केलेल्या पॉलिकॅप कंपनीची वायरच खरेदी केल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. आझाद रोडवरील गटारी बांधण्यास, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड डांबरीकरणास मंजुरी दिली. राष्ट्रवादीचे नगरसेवक रामदास कुराडे व दीपा बरगे वगळता सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी तानाजी नरळे उपस्थित होते.