शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

बिद्री कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्प उभारणीस मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:37 IST

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी इथेनॉल प्रकल्प उभारणीस टाळ्यांचा गजरात मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील होते. या सभेत ९६ कोटी ५० लाखांचा डिस्टिलरीसह इथेनॉल प्रकल्प, आठ हजार गाळप क्षमता विस्तारीकरण, नऊ हजार ८२० ...

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी इथेनॉल प्रकल्प उभारणीस टाळ्यांचा गजरात मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील होते. या सभेत ९६ कोटी ५० लाखांचा डिस्टिलरीसह इथेनॉल प्रकल्प, आठ हजार गाळप क्षमता विस्तारीकरण, नऊ हजार ८२० पात्र सभासद नियम व अटी पूर्ण करून करणे, २३१ रुपयांचे थकीत देणे, २०१९ नंतर नोकर भरती या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.अध्यक्ष पाटील म्हणाले, केवळ साखर उत्पादन करून साखर कारखाने चालविणे सद्य:स्थितीत अवघड बनले आहे. सध्याच्या आव्हानात्मक काळात सहवीज प्रकल्प उभारल्यामुळेच बिद्रीला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी काळानुसार बदलणे आवश्यकअसून सभासदांच्या हितासाठी कारखान्यामार्फत इथेनॉल प्रकल्प उभारला जाईल. वीज व पेट्रोलियम पदार्थांची गरज ही कायमपणे लागणार असल्याने केंद्र शासनाने इथेनॉल प्रकल्प उभारणासाठी प्रोत्साहन धोरण जाहीर केले असून ६ टक्के व्याजदराने ८० कोटीपर्यंत रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पासाठी ९६ कोटी ५० लाख खर्च उपेक्षित आहे. शासनाच्या उपक्रमाचा लाभ घेऊन तो शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी यापूर्वी मंजूर असलेल्या डिस्टलरीसह इथेनॉल प्रकल्प उभारत आहे.पाटील म्हणाले, कार्यक्षेत्रातील सर्व शेतकºयांचा ऊस वेळेत गाळप होण्यासाठी कारखान्याची गाळप क्षमता आठ हजार मे. टनांपर्यंत वाढविण्याचा मागील वार्षिक सभेत निर्णय घेतला असून, त्याचा परवाना मिळवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ऊस लावणीची नोंद शेतकºयांच्या शेतावर जाऊन मोबाईल टॅबद्वारे घेतली जाणार असून त्याची नोंद आॅनलाईन कारखान्याकडे करून ऊस तोडणी कार्यक्रमात सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या हंगामात ऊस टोळ्यांसाठी अ‍ॅडव्हान्स देऊन पुरेशी तोडणी यंत्रणा सक्षम केलेली आहे.चर्चेत तानाजी खोत, बी. टी. मुसळे, शहाजी शिंदे, बंडा पाटील, पांडुरंग जरग, आदींनी सहभाग घेतला. सभेस कारखान्याचे संचालक याबरोबरच सूतगिरणीचे अध्यक्ष पंडितराव केणे, मार्केट कमिटीचे संचालक नेताजी पाटील, नाथाजी पाटील, जि. प.चे सदस्य मनोज फराकटे, राहुल देसाई, दिग्विजय पाटील, सुनीलराव कांबळे, बाळासाहेब भोपळे, पं. स.चे माजी सदस्य रघुनाथ कुंभार, एकनाथ चव्हाण, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, भूषण पाटील, माजी सरपंच विकास पाटील, एम. एस. पाटील उपस्थित होते.कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांनी नोटीस वाचन केले. सचिव एस. जी. किल्लेदार यांनी मागील सभेचे प्रोसिंडिग वाचन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी आभार मानले.