शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीवर अखेर प्रशासक नियुक्ती

By admin | Updated: April 12, 2017 01:21 IST

ग्रामपंचायत केली बरखास्त : नगरपालिका स्थापन करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथे नगरपालिका स्थापन होण्याचे रौप्यनगरीवासीयांचे गेल्या ४५ वर्षांपासूनचे असणारे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी राज्य शासनाने मंगळवारी ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपालिका उभारणीच्या प्रक्रियेस प्रत्यक्षात सुरुवात केली. तहसीलदार वैशाली राजमाने यांनी मंगळवारी रात्री प्रभारी सरपंच भारती बावचे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. हुपरी शहराची लोकसंख्या सुमारे ५० हजारांहून अधिक झाली आहे. शहराचा विस्तार मोठ्याप्रमाणात वाढल्याने नागरिकांना सर्वप्रकारच्या नागरी सुविधा पुरविणे ग्रामपंचायतीला अशक्य झाले होते. परिणामी नागरी विकासकामांचा पूर्णपणे बोजवारा उडाला होता. अशी परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झाली असतानाही सर्वच राजकीय पक्षांचे नेते व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नगरपालिका करण्याचे वारंवार केवळ आश्वासन देऊन रौप्यनगरीवासीयांची बोळवण चालविली होती. परिणामी सर्वच वृत्तपत्रांचे पत्रकार, सर्व राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, तरुण मंडळे, तालीम संघटना व नागरिकांच्या बळावर नगरपालिका कृती समितीची उभारणी करून, गेल्या दोन वर्षांपासून विविध प्रकारच्या आंदोलनांबरोबरच राज्य शासनाकडे या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. कृती समितीच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाला अखेर ३० जुलै २०१५ रोजी हुपरी येथे नगरपालिका स्थापन करण्याबाबतचा पहिला अध्यादेश काढावा लागला. त्यानंतरही कृती समितीने या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता.दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार सुरेश हाळवणकर यांनी निवडणुका संपताच या ठिकाणी नगरपालिकेची निश्चितपणे उभारणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे रौप्यनगरीवासीयांनी भाजप उमेदवारांच्या पदरात मोठ्याप्रमाणात मते टाकून विजयी केले आहे. याबाबतची जाणीव जनता समूहाचे संस्थापक आण्णासाहेब शेंडुरे यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार सुरेश हाळवणकर यांना वेळोवेळी करून देऊन त्याबाबतचा पाठपुरावाही सुरू ठेवला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. ६) हुपरी येथे नगरपालिकेची स्थापना करण्याचा अंतिम अध्यादेश काढला. यावेळी दौलतराव पाटील, बाळासाहेब रणदिवे, किरण कांबळे, राजेंद्र सुतार, सचिन गाठ, संभाजी हांडे, धर्मा कांबळे, जयकुमार माळगे, सुदर्शन खाडे, सयाजीराव पाटील, बाबासाहेब गायकवाड, सर्जेराव हांडे, तसेच कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, बाळासाहेब कांबळे, तानाजी घोरपडे, आदी उपस्थित होते.प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करू : राजमानेयावेळी प्रशासक व तहसीलदार वैशाली राजमाने म्हणाल्या, या शासन निर्णयाने रौप्यनगरीवासीयांचे गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिका व्हावी असे स्वप्न सत्यात उतरत आहे. जनतेच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी येथे लवकरात लवकर नगरपालिकेची उभारणी होण्यासाठी अगदी तत्परतेने प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करू. तसेच नगरपालिका मंजुरीसाठी स्थानिक पत्रकारांनी उभारलेला लढा व घेतलेले परिश्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.