शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांतील माहिती संकलनासाठी ४५५ शिक्षकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:25 IST

इचलकरंजी : शहर परिसरातील खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या बाह्यरुग्णांची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळावी, यासाठी ४५५ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली ...

इचलकरंजी : शहर परिसरातील खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या बाह्यरुग्णांची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळावी, यासाठी ४५५ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मृत्युदर रोखण्यासाठी प्राथमिक लक्षणे असणाऱ्यांना तातडीने उपचार सुरू करण्यासाठी या मोहिमेतून प्रशासनाला मदत होणार आहे.

शहरात सध्या ४०० हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. काहीजण घरी, तर काहीजण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याचबरोबर परिसरातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यातूनही खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण, नातेवाइकांचे बाहेर फिरणे, इतर गावातील नातेवाइकांचे रुग्णांकडे येणे-जाणे सुरू असल्याने संसर्ग फैलावत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक खासगी रुग्णालयांत एका शिक्षकाची नेमणूक केली आहे. त्याद्वारे रुग्णांची माहिती, आजार, लक्षणे व उपचार असा अहवाल शासनाला मिळणार आहे. यासाठी आरोग्य विभाग व मुख्याधिकारी यांच्या आदेशाने ४५५ प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित शिक्षकांना अ‍ॅँटिजन टेस्ट करण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.