शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार! सप्टेंबरचे १५०० रुपये लवकरच मिळणार, तारीख आली समोर
2
"क्या बड़ा तो सबसे दम बड़ा, राग आला की...", गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
3
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण केली, लाखो रुपये पळवले
4
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
5
जर्मनीपासून एक पाऊल दूर! ट्रम्प यांच्या निकटवर्तीयानंही मान्य केली भारताची ताकद, भागीदारीसाठी हात पुढे
6
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
7
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
8
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
9
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
10
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
11
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
12
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
13
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
14
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
15
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
16
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
17
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
18
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
19
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
20
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला

‘मयता’च्या अर्जाने ‘सात-बाऱ्या’त फेरफार

By admin | Updated: September 24, 2015 23:54 IST

तहसीलदारांनाही फसविले : ‘देवस्थान’ व ‘धर्मादाय’च्या मान्यतेशिवाय खाते फोडून केला इनाम खालसा

राम मगदूम -- गडहिंग्लज --‘श्री गणपती देवा’च्या जमिनीचे वहिवाटदार गजानन बाळकृष्ण  -जोशी-दंडगे यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी त्यांच्याच नावाने व सहीने अर्ज करण्यात आला. त्यानुसार कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता तत्कालीन तहसीलदारांनी ‘देवा’च्या जमिनीचा ७/१२ स्वतंत्र करून त्यापैकी एका गट नंबरवरील ‘देवस्थान इनाम’ खालसा करून दिला. ‘मयता’च्या नावे फेरफारासाठी अर्ज करणारा इसम कोण ? त्याचा हेतू कोणता? त्याचा शोध ‘महसूल खाते’ घेत आहे.इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री गणपती देवाच्या जमिनीचे वहिवाटदार गजानन बाळकृष्ण जोशी-दंडगे यांचा मृत्यू ८ सप्टेंबर २००५ ला झाला. त्यांच्या मृत्यूबरोबरच त्यांनी आपला भाऊ मनोहर बाळकृष्ण जोशी-दंडगे यांना ४६ वर्षांपूर्वी करून दिलेले वटमुखत्यारपत्र देखील रद्दबातल ठरते, असे असतानाही मूळ वहिवाटदाराच्या नावाने व सहीने ‘देवा’च्या जमिनीची खातेफोड करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला.२८ आॅगस्ट २००८ ला ‘गडहिंग्लज’च्या तत्कालीन तहसीलदारांकडे ७/१२ स्वतंत्र होऊन मिळण्यासाठी ग.बा. जोशी-दंडगे यांचे नावे व सहीने अर्ज करण्यात आला. ‘देवस्थान जमिनीची मालकी असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची परवानगी किंवा धर्मादाय आयुक्तांचा ‘अभिप्राय’ न घेताच तहसीलदारांनी देवस्थान जमिनीचे खाते स्वतंत्र करण्याचा ‘आदेश’ दिला आणि त्यांच्या ‘हुकूमा’ची अंमलबजावणी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी ‘तातडी’ने केली. यापाठीमागचे गौडबंगाल काय? याचीच चर्चा इंचनाळ पंचक्रोशीसह जिल्हाभर सुरू आहे.‘सात-बाऱ्या’त असा झाला ‘फेरफार’२७ नोव्हेंबर १९५९ : देवस्थान जमिनीचे वहिवाटदार गजानन बाळकृष्ण जोशी यांनी आपला भाऊ मनोहर बाळकृष्ण जोशी यांना संंबंधित जमिनीसंदर्भात वटमुखत्यारपत्र करून दिले.८ सप्टेंबर २००५ : गजानन बाळकृृष्ण जोशी यांचा मृत्यू.२८ आॅगस्ट २००८ : ७/१२ स्वतंत्र होऊन मिळण्यासाठी गजानन बाळकृृष्ण जोशी-दंडगे यांच्या नावे व सहीने तहसीलदारांकडे अर्ज करण्यात आला.२४ आॅगस्ट २००८ : ७/१२ स्वतंत्र होऊन मिळण्यासाठी ‘२८ आॅगस्ट’ ला आलेला अर्ज तहसीलदारांनी ‘२४ आॅगस्ट’ला वाचला. तहसीलदारांच्या आदेशात ‘तारखे’चा हा घोळ दिसतो.१६ सप्टेंबर २००८ : देवस्थान जमिनीचे स्वतंत्र दोन गट नंबर व एका गट नंबरवरील ‘इनाम खालसा’ करण्याचे तत्कालीन तहसीलदारांचे बेकायदेशीर आदेश.३ आॅक्टोबर २००८ : तहसीलदारांच्या हुकुमानुसार देवस्थान जमिनीच्या ‘सात-बाऱ्या’वर फेरफाराची नोंद‘देवस्थान इनाम’ केला ‘देवस्थान खालसा’पूर्वी या जमिनीचा गट नंबर व हिस्सा क्रमांक २७३/१ आणि एकूण क्षेत्र दोन हेक्टर ६९ आर पोट खराब ०-१५ आर असे होते. फेरफारीनंतर २७३/१अ व २७३/१ ब असे दोन गट नंबर झाले. त्याचे क्षेत्र अनुक्रमे २७३/१अ क्षेत्र १ हेक्टर २९ आर. पोट खराब ०-०७ आर (देवस्थान खालसा), २७३/१ ब क्षेत्र १ हेक्टर ४० आर पोट खराब ०-०८ आर (देवस्थान इनाम) असे करण्यात आले.