शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुरलीधर जाधवच्या विरोधात अपील

By admin | Updated: February 5, 2015 00:28 IST

क्रिकेट बेटिंग प्रकरण : जाधवच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांचा चंग

कोल्हापूर : दहा दिवसांनी सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान क्रिकेट बेटिंगचा धंदा जोमाने सुरू होण्याची दाट शक्यता असल्याने या बेटिंगचा मुुख्य सूत्रधार नगरसेवक मुरलीधर पांडुरंग जाधव याचा जामीन रद्द होण्यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात रिव्हिजन (अपील) दाखल केले आहे. त्यामुळे जाधव याच्या मुसक्या आवळण्याचा चंग पोलिसांनी बांधल्याचे स्पष्ट होत आहे. टाकाळा येथील नगरसेवक जाधव यांच्या जयंत रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. ४०२ मध्ये २३ जानेवारी रोजी राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकला असता प्रकाश श्रीचंद जग्याशी व लक्ष्मण सफरमल कटयार (रा. गांधीनगर) हे दोघे आॅस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडच्या चालू क्रिकेट मॅचवर बेटिंग घेत असताना दिसून आले. मुुख्य सूत्रधार नगरसेवक जाधव याने गुन्ह्याच्या कामी परस्पर न्यायालयात हजर राहून जामीन मिळविला आहे. गुन्ह्यामध्ये आरोपींनी सांकेतिक भाषेचा वापर केला आहे. गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असून बेटिंगचे प्रशिक्षण आरोपी कोणाकडे घेतात, त्यांचे आणखी कोणाकोणाशी लागेबांधे आहेत, बेटिंगकरिता लागणारे भांडवल त्यांनी कोठून उपलब्ध केले, आणखी कोणाचा यामध्ये सहभाग आहे, आदी मुद्द्यांवर आरोपींकडे सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. या आरोपींना सहजासहजी जामीन झाल्याने गुन्ह्याचा तपास करता येत नाही; तसेच आरोपींवर कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्याचा गैरफायदा घेऊन ते येत्या दहा दिवसांनी सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान बेटिंगचा धंदा जोमाने सुरू करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे या गुह्याच्या मुळापर्यंत जाऊन अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोपींना अटक होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्य सूत्रधार जाधव याचा जामीन रद्द करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात रिव्हिजन (अपील) दाखल केले आहे. मंगळवारी बेटिंगमध्ये सहभागी असलेल्या दोघा व्यक्तींकडे पोलिसांनी कसून चौकशी केली.