शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जोडणीसाठी ‘आप्पा’ गडहिंग्लजमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:29 IST

गडहिंग्लज : खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी त्यांचे चुलते माजी आमदार महादेवराव महाडिक (आप्पा) यांनी सोमवारी गडहिंग्लज तालुक्यातील मान्यवरांच्या ...

गडहिंग्लज : खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी त्यांचे चुलते माजी आमदार महादेवराव महाडिक (आप्पा) यांनी सोमवारी गडहिंग्लज तालुक्यातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांनी पुतण्यासाठी केलेल्या ‘जुळणी दौऱ्या’ची गडहिंग्लजसह जिल्ह्यात विशेष चर्चा झाली. चार तासांच्या दौऱ्यात त्यांनी जनता दलाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, रेखाताई हत्तरकी, सदानंद हत्तरकी, भाजपचे नेते प्रकाशराव चव्हाण, माजी संचालक बी. टी. पाटील यांचे चिरंजीव व राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते जि. प. सदस्य सतीश पाटील, माजी जि. प. सदस्य जयकुमार मुन्नोळी यांच्या घरी जाऊन त्यांनी लोकसभेसाठी धनंजय यांना मदत करण्याची विनंती केली.शिंदे यांनी लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत मंडलिक यांनाच मदत केली. गेल्यावेळी त्यांचे चिरंजीव संजय मंडलिक हे शिवसेनेकडून लढले होते. त्यावेळीही शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली होती. त्यामुळे आप्पांनी अगदी ‘वेळेत’ येऊन त्यांना साकडे घातले आहे.स्वाती कोरी यांना ‘गोकुळ’ची उमेदवारी ?‘गोकुळ’चे विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे हे पूर्वाश्रमीचे जनता दलाचे आजरा तालुकाध्यक्ष होत. त्यानंतर जनता दलाच्या वाटणीला आलेल्या ‘गोकुळ’च्या जागेवर ‘जद’चे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अरुण सोनाळकर यांच्या पत्नी यांना संधी देण्यात आली होती. मात्र, येत्या निवडणुकीत जनता दलातर्फे अ‍ॅड. शिंदे यांची कन्या नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यांना ‘गोकुळ’च्या रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या ‘उमेदवारीचा शब्द’ देऊन शिंदे यांची मदत मिळविण्याचा महाडिक यांचा प्रयत्न सुरू आहे.