शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या इमारतीच्या जागेवर बनत आहेत अपार्टमेट

By admin | Updated: August 13, 2014 23:32 IST

महानगरातील ट्रेंड कोल्हापुरात :शासनाने एफएसआय, टीडीआर सवलत देण्याचे मागणी

संतोष पाटील - कोल्हापूर==मुंबई महानगरात जुन्या - कमकुवत इमारतींच्या जागी नव्या इमारती बांधण्यासाठी राज्य शासन विविध सवलती देऊन प्रोत्साहन देत आहे. कोल्हापूरातही शहरातील मोक्याच्या व प्रशस्त जागेत असणाऱ्या जुन्या जीर्ण इमारतींमधील रहिवाशांच्या गरजा पूर्ण करत याजागी नव्या आलिशान इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर चटई निर्देशांक (एफएसआय) व हस्तांतरण विकसित हक्काची (टीडीआर) सवलत शासनाने द्यावी, अशी मागणी नागरिक व बांधकाम व्यावसायिकांतून होत आहे.मुंबई-ठाणे परिसरातील ६० ते ७० वर्षांपूर्वीच्या इमारती कोसळण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. जीवित व वित्तहानी वाढल्यानेच राज्य शासनाने मुंबई परिसरातील जुन्या इमारती काढून त्या जागी नव्या इमारती उभारण्यासाठी एफएसआय व टीडीआरसारख्या सवलती शिथिल केल्या. राज्यातील सर्वच मोठ्या शहरात गावठाणमधील जागा दुर्मीळ झाली आहे. सर्व सोयींसुविधा तत्काळ उपलब्ध होत असल्याने व्यवसायासह रहिवासी कारणांसाठी गावठाणमधील जागांना मोठी मागणी आहे. कोल्हापूर शहरातही अशा जागाच आता उपलब्ध नसल्याने १० ते १५ वर्षांपूर्वी बांधलेल्या मोठ्या इमारतींच्या जागी नव्याने टोलेजंग इमारती उभारण्याचा ‘फंडा’ सुरू झाला आहे.शहरात रस्ते विकास प्रकल्प पूर्ण होताच रिकाम्या जागेसह रहिवासी घरांचे दर दुप्पट-तिप्पट झाले. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर घर खरेदी गेली. पुण्या-मुंबईतील ग्राहक तसेच दुहेरी घर घेण्याची क्षमता असणाऱ्या स्थानिक ग्राहकांची संख्याही रोडावल्याने शहरातील बांधकाम व्यवसायास एक प्रकारची मरगळ आली आहे. जुन्या इमारतींच्या जागी नवी इमारत उभारण्याचा नवा पर्याय बांधकाम व्यावसायिकांसमोर आहे. आणखी एक-दोन वर्षे बांधकाम क्षेत्रातील मंदी सुरूच राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. यास पर्याय म्हणूनही बांधकाम व्यावसायिक जुन्या जागी नव्या अपार्टमेंट उभारण्यास उत्सुकता दाखवित आहेत.जुन्या इमारती या शहराच्या मध्यवर्ती व मुख्य ठिकाणी आहेत. प्रशस्त जागाच शहरात शिल्लक नसल्याने अशा जुन्या इमारती विकसित करून रहिवाशांना त्यांचा योग्य मोबदला देत नव्या इमारती बांधणे सर्वांच्याच फायद्याचे आहे. सध्या अशा इमारती विकसित करण्याचे प्रमाण कमी असले, तरी भविष्यात याचा वेग वाढणार आहे. - दिलीप रोकडे, बांधकाम व्यावसायिकपूर्वी गरजेनुसार घेतलेला फ्लॅट सध्या कु टुंबासाठी अपुरा पडत आहे.या पर्यायाने इतर खर्च न करता नवा कोरा, पूर्वीपेक्षा अत्याधुनिक व मोठा फ्लॅट मिळतो.जुन्या इमारतींच्या जागा निर्वेध असल्याने महापालिकेची परवानगी मिळविणे त्यामानाने सोपे.वाढीव ‘एफएसआय’ व ‘टीडीआर’चा पर्याय वापरून बांधकाम व्यावसायिकांचा नफा.शहर आडवे वाढण्यास मर्यादा असल्याने उभे वाढविण्याचा नवा पर्याय.