शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सुनावणीसाठी आणखीन तारीख

By admin | Updated: September 8, 2015 00:50 IST

किमान वेतन प्रश्न : सुनावणी लांबत चालल्याने इचलकरंजीत अस्वस्थता

इचलकरंजी : यंत्रमाग कामगार सुधारित किमान वेतनाबाबतच्या उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी आणखीन पुढील तारीख पडल्याने येथील वस्त्रोद्योगात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. गेले ४८ दिवस चालू असलेल्या सायझिंग कामगारांचा संप संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नसल्याने आता वस्त्रनगरीमध्ये तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यंत्रमाग कामगारांच्या सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने २१ जुलैपासून संप सुरू केला आहे. संपामुळे सायझिंग कारखान्यांपाठोपाठ बहुतांशी यंत्रमाग कारखानेही बंद पडले आहेत. कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसर्स कारखान्यांनाही आता कापडाची कमतरता भासू लागली आहे. दररोज होणारी शंभर कोटी रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. परिणामी इचलकरंजीत कमालीची आर्थिक टंचाई भासू लागली आहे.दीड महिना झाला तरी काही कामगारांना वेतन नाही, तर कापडाच्या उत्पादनात घट झाल्याने काहींना तुटपुंजे वेतन मिळत आहे. त्यामुळे आठवडी बाजार ओस पडले आहेत. संपाचा परिणामा आता उपाहारगृहे, खानावळी, चित्रपटगृहांवरही दिसू लागला आहे. अशा पार्श्वभूमीवर इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन व सायझिंग असोसिएशनने यापूर्वी किमान वेतनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किमान वेतनाच्या अंमलबजावणीला उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली तरी संप संपुष्टात येईल, अशी आशा सायझिंग, यंत्रमाग, प्रोसेसर्स उद्योगातील कारखानदारांबरोबर कामगारांनाही वाटते आहे, ज्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात येथील वस्त्रोद्योग पूर्वीप्रमाणेच सुरू होईल आणि जनजीवन पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे.मात्र, उच्च न्यायालयात किमान वेतनाविषयी म्हणणे मांडण्यास शासन दरवेळी तारीख मागून घेत असल्याने न्यायालयातील सुनावणी तीनवेळा पुढे ढकलली. सोमवारीही उच्च न्यायालयात म्हणणे मांडण्यास सरकारतर्फे अ‍ॅटर्नी जनरलना मुदत द्यावी, असे सांगण्यात आले आणि उच्च न्यायालयाने १४ सप्टेंबरला पुढील सुनावणी ठेवली. न्यायालयामध्ये लांबत चाललेली प्रक्रिया पाहता वस्त्रनगरीत मात्र कमालीची अस्वस्थता आहे. गणेश चतुर्थी, बकरी ईद आणि त्यापाठोपाठ येणारा नवरात्रौत्सव, दसरा-दिवाळी असे सण पाहता उद्योजकांबरोबरच आता कामगार वर्गामध्येसुद्धा चिंतेचे वातावरण आहे. कामगार संघटनांचा शनिवारी तिरडी मोर्चाइचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यास शासनाकडून टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. १२) शंखध्वनी करीत तिरडी मोर्चा काढण्याची घोषणा यंत्रमाग कामगार संघटनांच्या कृती समितीने केली. थोरात चौकात सोमवारी सायंकाळी झालेल्या सभेत ही घोषणा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी परशराम आगम होते. किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी कृती समितीने सुरू केलेल्या आंदोलनाची पुढील दिशा सांगण्यासाठी ही सभा बोलविली होती. शनिवारी (दि. ५) राजीव गांधी सांस्कृतिक भवनातील बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला तोडगा सायझिंगधारक मान्य करीत नसल्याबद्दल सभेत जोरदार टीका करण्यात आली. सभेमध्ये कृती समितीचे अध्यक्ष दत्ता माने, शामराव कुलकर्णी, भरमा कांबळे, हणमंत लोहार, आनंदा गुरव, बंडोपंत सातपुते, शिवानंद पाटील, राजेंद्र निकम व धोंडिराम कुंभार यांची भाषणे झाली. सभेत दत्ता माने यांनी, सायझिंग कामगारांच्या संप काळात बंद पडलेल्या यंत्रमाग कारखान्यांमधील कामगारांनी दररोज ४०७ रुपयेप्रमाणे खोटीचा पगार मागावा व किमान वेतनाच्या फरकाचे क्लेम दाखल करावेत, असे आवाहन केले.कामगार संघटनांचा शनिवारी तिरडी मोर्चाइचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यास शासनाकडून टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. १२) शंखध्वनी करीत तिरडी मोर्चा काढण्याची घोषणा यंत्रमाग कामगार संघटनांच्या कृती समितीने केली. थोरात चौकात सोमवारी सायंकाळी झालेल्या सभेत ही घोषणा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी परशराम आगम होते. किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी कृती समितीने सुरू केलेल्या आंदोलनाची पुढील दिशा सांगण्यासाठी ही सभा बोलविली होती. शनिवारी (दि. ५) राजीव गांधी सांस्कृतिक भवनातील बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला तोडगा सायझिंगधारक मान्य करीत नसल्याबद्दल सभेत जोरदार टीका करण्यात आली. सभेमध्ये कृती समितीचे अध्यक्ष दत्ता माने, शामराव कुलकर्णी, भरमा कांबळे, हणमंत लोहार, आनंदा गुरव, बंडोपंत सातपुते, शिवानंद पाटील, राजेंद्र निकम व धोंडिराम कुंभार यांची भाषणे झाली. सभेत दत्ता माने यांनी, सायझिंग कामगारांच्या संप काळात बंद पडलेल्या यंत्रमाग कारखान्यांमधील कामगारांनी दररोज ४०७ रुपयेप्रमाणे खोटीचा पगार मागावा व किमान वेतनाच्या फरकाचे क्लेम दाखल करावेत, असे आवाहन केले.