शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

घोषणांनी जिल्हा परिषद दुमदुमली

By admin | Updated: March 16, 2017 00:29 IST

लेखा कर्मचारी संघटनेचे आंदोलन : शासनाने दखल न घेतल्यास १० एप्रिलनंतर आमरण उपोषण

कोल्हापूर : विविध दहा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने बुधवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दिवसभर दुमदुमला. अनेक मान्यवरांनी दिवसभरामध्ये आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावण्यात आल्या. यानंतर बुधवार (दि. १५) पासून ‘लेखणी बंद’ आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनामागची भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट करून १० एप्रिलनंतर शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास संघटनेचे राज्याध्यक्ष विजयसिंह सूर्यवंशी व राज्य कार्यकारिणी यांच्या नेतृत्वाखाली धरणे व आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.जिल्हा परिषद लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांशी शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत भेदभाव करणे, जिल्हा सेवा वर्ग ३ (लेखा) श्रेणी १ मध्ये असलेले पद ‘सहायक लेखा अधिकारी’ यांना राजपत्रित दर्जा देणे, ग्रेड पे, लेखा लिपिक परीक्षा, उपलेखापाल परीक्षा व लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र वित्त व लेखा (जि. प.) सेवा वर्ग ३ चीच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे स्पर्धा परीक्षा जाहीर करणे, आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. राज्य कार्यकारिणीचे सदस्य महावीर सोळांकुरे, युनियन अध्यक्ष धनाजी जाधव, कोषाध्यक्ष संतोष ओतारी, सुरेश पाटील, अनिल माळवे, वैशाली पवार, बी. डी. पाटील, अशोक पाटील, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष सुधाकर कांबळे, सचिव रवींद्र गस्ते, लेखा संघटनेचे संघटक किरण निकम, अभिजित पाटील यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील, सभापती अभिजित तायशेटे, सीमा पाटील, पक्षप्रतोद शहाजी पाटील, माजी सदस्य अर्जुन आबिटकर आदींनी आंदोलनाला भेट दिली.