शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीची घोषणा केवळ लोकप्रियतेसाठीच

By admin | Updated: March 14, 2016 23:48 IST

आजरा ग्रामपंचायत : नगरसेवक पदाची स्वप्ने पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबतच्या विविध नेतेमंडळींकडून केल्या जाणाऱ्या घोषणा या केवळ सवंग लोकप्रियतेसाठीच असल्याचे स्पष्ट होत असून, गेली चार वर्षे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर नगरसेवक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या मंडळींचा मात्र पुन्हा पुन्हा भ्रमनिरास होत आहे.साडेतीन वर्षांपूर्वी आजरा ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यावेळी ग्रामपंचायतीची नगरपंचायत होणार, असे सांगत तंटामुक्ती समितीने निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्नही केला. यामुळे इच्छा असूनही अनेक इच्छुकांनी निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहणे पसंत केले. प्रत्यक्षात मात्र अद्याप ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर तर झालेले नाहीच; पण या चर्चेमुळे अनेकजण विनासायास सदस्य बनले आणि त्यांनी पदेही भोगली.सरपंचपदाचीही अवस्था अशीच राहिलीनगरपंचायतीची टांगती तलवार असल्याने या पदासाठीही वेळोवेळी बराच संघर्ष झाला. कधी तीन, तर कधी सहा महिन्यांसाठी सरपंचपदी संधी दिली गेल्याने सरपंचपदाची शानही निघून गेली. दरम्यान, गेल्या साडेतीन वर्षांत ज्या-ज्या नेतेमंडळींनी ग्रामपंचायतीला भेट दिली, त्यांनी मात्र लवकरच आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होणार, असे सांगितल्याने सरपंचपदाच्या संघर्षात भरच पडत गेली.साडेतीन वर्षे झाली; पण ग्रामपंचायतीचे काही नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले नाही. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार हसन मुश्रीफ, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह सर्वांनी आजरा नगरपंचायत होण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही सांगितल्याने आजरेकरांच्या आशा या घोषणेकडे लागून आहेत.एखाद्याने वर्षात, तर कुणी महिनाभरात नगरपंचायत करण्याचे आश्वासन दिले होते; पण या घोषणा केवळ लोकप्रियतेसाठीच होत्या, हे स्पष्ट होत आहे. आणखी दीड वर्षांनी रितसर ग्रामपंचायतीची निवडणूक आहेच. त्यामुळे नेतेमंडळींनी अशा घोषणा थांबवून नगरपंचायत होण्यासाठी थेट आपली ताकद वापरण्याची गरज आहे.४मुळातच दिशाहीन नेतृत्वामुळे आजरा तालुकावासीयांची फरफट होत असून, तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हा प्रश्नही याचाच एक भाग आहे. नेतेमंडळींकडून सामूहिक प्रयत्न झाल्याशिवाय आजरा ग्रामपंचायतीची नगरपंचायत होणे सध्या तरी अडचणीचे दिसते.