शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:26 IST

पूर येऊन गेल्यानंतर रोगराई पसरू न देणे हे एक मोठे आव्हान होते. तेही आमच्या सहकाऱ्यांनी पेलले. २५८ मशिन्सच्या माध्यमातून ...

पूर येऊन गेल्यानंतर रोगराई पसरू न देणे हे एक मोठे आव्हान होते. तेही आमच्या सहकाऱ्यांनी पेलले. २५८ मशिन्सच्या माध्यमातून फाॅगिंग करण्यात आले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने आमच्या विनंतीला मान दिला आणि ग्रामस्वच्छतेसाठी १२५ कर्मचारी, यंत्रसामग्री आणि वाहने पाठविली. त्यामुळे प्रामुख्याने करवीर, शिरोळ, हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या स्वच्छता मोहिमेला मोलाचा हातभार लागला. सर्व नागरिकांना आवश्यक त्या औषधी गोळ्यांचेही युद्धपातळीवर वाटप करण्यात आले. पिण्याच्या पाण्यापासून कोणताही प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ब्लिचिंग पावडर, तुरटीचा पुरवठा करण्यात आला. यामुळे पुरानंतर कोणत्याही गावात साथीचे आजार पसरले नाहीत. अगदी सॅनिटरी नॅपकीनचेही वितरण करण्यात आले.

केंद्र शासनाच्या वतीने जिल्ह्यातील ५४ दुर्गम गावांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी ४० लाख रुपयांचे मोबाइल मेडिकल युनिट पुरविण्यात आले आहे. त्यामार्फत नियोजित वेळापत्रकानुसार आरोग्य सेवा दिली जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे संपूर्ण जिल्ह्याच्या समन्वयाची जबाबदारी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २० लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा लसीकरणात प्रथम क्रमांकावर आहे.

जिल्हा परिषद कामकाजाची अन्य वैशिष्ट्ये

१ कोरोना काळातही प्रभावीपणे विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन. समूह शिक्षणात शिक्षक व विद्यार्थी यांनी मोलाची कामगिरी केली. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात सर्वाधिक १८९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र. ९ कोटी ९ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार. ‘माझा टीव्ही, माझी शाळा’ या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ. बानगे येथील प्राथमिक शाळेत स्टुडिओची उभारणी. ऑनलाइन शाळा व्हर्च्युअल अकॅडमीची ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कल्पक योजनेमुळे व पाठिंब्यामुळे सुरुवात झाली. शिक्षकांच्या ऑनलाइन अध्यापनाचे अवलोकन व संनियंत्रण करता यावे, त्यांच्याबाबत उपस्थितीच्या तक्रारींना आळा बसावा यासाठीही काही तांत्रिक सहकार्याच्या माध्यमातून यंत्रणा विकसित करण्याचा मानस आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा भौतिक विकास नक्कीच उल्लेखनीय आहे. यापुढे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला प्राधान्य देणार आहे.

२ जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याचे बांधकाम वेगाने सुरू आहे. महापुरानंतर जिथे गरज आहे तेथील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे नियोजन.

३ पूरकाळात बंद असलेल्या ६३४ पाणीपुरवठा योजनांपैकी तातडीच्या प्रयत्नांतून ६२२ योजना दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत. जलजीवनमधील नव्या योजनांबाबत कार्यवाही. पूरकाळात बंद पडलेल्या ३६७ कूपनलिकांची दुरुस्ती. यासाठी अन्य जिल्ह्यांतील पाच पथकांची घेतली मदत. आरोग्य विभागाच्या दाखल्यानंतरच पाणीपुरवठा केला सुरू.

४ कोरोना काळातच जिल्ह्यातील २ हजार ४३० दिव्यांगांना प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे १ कोटी २० लाख १५ हजार रुपये अनुदानाचे वितरण

५ कोल्हापूर जिल्हा परिषद पुन्हा एकदा यशवंत पंचायत राज अभियानमध्ये राज्यात पहिली आली आहे. कोरोना आणि पूरकाळात ग्रामपंचायत विभागाचा सर्व विभागांशी असलेला समन्वय ठरला उपयुक्त.

६ सामान्य प्रशासन विभागाने कोरोना आणि पूरकाळामध्ये समन्वयाची मोठी भूमिका बजावली. कोरोनाच्या कान्टॅक्ट ट्रेसिंगची जबाबदारीही या विभागाने उत्तम पद्धतीने सांभाळली.

७ या सर्व कामामध्ये वित्त विभागाने सातत्याने अर्थविषयक बाबींबाबत सकारात्मक भूमिका घेतली. शासकीय निधीचा अपव्यय होऊ नये यासह देयके अदा करण्यासाठीही हा विभाग चांगल्या पद्धतीने सक्रिय राहिला.

८ कोरोना काळात गेल्या दीड वर्षात ६२ कोटी रुपयांचा पोषण आहार जिल्ह्यात घरोघरी पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे.

९ कृषी विभागाने प्रतिवर्षीप्रमाणे राष्ट्रीय बायोगॅस उभारणीमध्ये आपले अव्वल स्थान कायम ठेवले असून, वैयक्तिक लाभाच्या योजनाही प्रभावीपणे राबविल्या आहेत.

१० पशुसंवर्धन विभागाने यंदाच्या महापुराआधी जिल्ह्यातून पशुधन वाचविण्यासाठी दक्षतेची भूमिका घेतली आणि वेळेत जनावरे सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यामुळे पशुधनाची हानी झाली नाही.

११ शौचालय बांधणीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी, स्वच्छता दर्पण वैयक्तिक नळजोडणीमध्ये महाराष्ट्रात अव्वल असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने कोरोना काळात आणि पूरकाळातही मोठ्या प्रमाणावर जनजागरण करून महत्त्वाची भूमिका बजावली.

१२ महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी जरी सध्या कोरोनामुळे वाव नसला तरी त्याबाबत सातत्यपूर्ण आढावा आणि महाआवास योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच जिल्ह्यांत उत्तम कामगिरी करण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचा समावेश करण्यात आला आहे.

१३) कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी व जिल्हा नियोजन मंडळाने जिल्हा नियोजन मंडळातून जिल्हा परिषदेच्या विविध कामांना भरीव निधी दिल्यामुळेच जनतेच्या उपयोगी पडणाऱ्या विविध योजना राबविता आल्या. कोरोनाचा प्रभावी सामना करता आला.

चौकट

जिल्हा परिषदेच्या सर्व घोडदौडीमध्ये आश्वासक

पाठबळ आणि सहकार्य

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह खासदार आणि आमदाररांचे हे काम करताना जिल्हा परिषदेला मोठे सहकार्य मिळाले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व मागण्यांना या तीनही मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, काही मागण्यांबाबत कार्यवाहीही झाली आहे. जिल्हा परिषदेचे सर्व आजी, माजी पदाधिकारी, सर्व जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पंचायत समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायती, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांचे याकामी मोठे योगदान आहे. या सामूहिक बळावरच जिल्हा परिषद ही कामगिरी करू शकली. जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू-भगिनी, माध्यम प्रतिनिधी यांनीही वेळोवेळी आमच्या चुका निदर्शनास आणून देऊन, तसेच चांगल्या कामाचे कौतुक करून आमचा उत्साह वाढविला आहे. यापुढील कालावधीत ‘आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक स्वच्छता या त्रिसूत्रीला प्राधान्य’ देण्याची भूमिका राहील.

महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने आपले वेगळेपण याआधीच सिद्ध केले आहे. आता यापुढच्या कोरोनोत्तर काळामध्ये हेच वेगळेपण अधिक दृढ करून ‘छत्रपती शाहू महाराजांनी जनतेच्या सेवेसाठी घालून दिलेल्या आदर्शांना प्रमाण मानून आमच्या कामाचा गुणात्मक दर्जा वाढीचा जाणीवपूर्वक प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत.’

*संजयसिंह चव्हाण*

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर