शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रॅलीच्या माध्यमातून ‘रानमोडी’चे उच्चाटन

By admin | Updated: January 5, 2015 00:40 IST

पन्हाळा तालुक्यात रॅली : निसर्गमित्र, राजाराम महाविद्यालयाचा उपक्रम

पोर्ले तर्फ ठाणे : निसर्गमित्र संघटना आणि राजाराम महाविद्यालयाच्या वतीने पन्हाळा पश्चिम भागात ‘निसर्गाकडे चला’ असा संदेश देत सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून ‘रानमोडी’ तणाचे श्रमदानातून उच्चाटन करण्यात आले. कोल्हापूर येथील शाहू मिल, मंगेशकरनगर, बेलबाग परिसरातील ‘रानमोडी’ तणाचे उच्चाटन करून रॅली सुरू झाली. रॅलीच्या दरम्यान येणाऱ्या गावातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, सार्वजनिक मंडळे, महिला बचत गट, शेतकरी, कष्टकरी यांच्यात ‘रानमोडी’ व पर्यावरण जागृतीविषयी कृतिशील प्रबोधन करण्यात आले. शेती आणि जंगलसंपदेवर अतिक्रमण करणाऱ्या तणांची माहिती देण्यात आली.पर्यावरणपूरक जीवनशैली आचरणात आणण्याच्या दृष्टिकोनातून पाण्याचे महत्त्व, कचऱ्याचे विघटन, प्लास्टिकचा गैरवापर, विजेचा वापर कमी, सौरऊर्जेचा वापर, आदींविषयी ग्रामस्थांना विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. तुकाराम महाराजांचा ‘पर्यावरणपूरक संदेश’ देणाऱ्या माहितीपटाद्वारे मार्गदर्शन केले. शाळेतील मुलांना ‘लाखमोलाची गोष्ट’, निसर्गखेळातून पर्यावरणाची जनजागृती, पथनाट्याद्वारे प्रात्यक्षिके करून राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले.रॅलीच्या दरम्यान निसर्गमित्र अनिल चौगुले, दिनकर चौगुले, ‘राजाराम’च्या प्रा. डॉ. अंजली पाटील, प्रा. शामराव कांबळे, प्रा. अजित आकोळकर यांनी मार्गदर्शन केले, तर प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन राजाराम महाविद्यालयातील ३० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘निसर्गाकडे चला’चा संदेश देत रानमोडी तणांची माहिती दिली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, ग्रामस्थ, सार्वजनिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)पर्यावरणाबाबत लोकांत सकारात्मक दृष्टिकोनाची कमतरता आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीला धोका निर्माण करणाऱ्या वस्तू नाकारण्याची मन:स्थिती तयार होऊ शकत नाही, तोपर्यंत पर्यावरण वाचू शकत नाही. लोकांनी पुनर्वापर आणि पुन:निर्मित वस्तूंचा वापर करायला हवा. तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीतील घटकांचे लेखापरीक्षण होणे काळाची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. - अनिल चौगुले, निसर्गमित्र.१८ गावांचा समावेशपन्हाळा तालुक्यातील आसुर्ले, पोर्ले तर्फ ठाणे, माजगाव, शिंदेवाडी, माळवाडी, देवठाणे, कसबा ठाणे, महाडिकवाडी, म्हाळुंगे, दिगवडे, तिरपण, कोतोली, पिंपळे, वाघवे, उत्रे, आदी गावांतून रॅलीने प्रबोधन केले.