कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, माथाडी कामगार नेते, मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान देणारे अण्णासाहेब पाटील यांची जयंती कोल्हापूर मराठा महासंघातर्फे साजरी करण्यात आली.
महासंघाच्या येथील कार्यालयात महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या हस्ते कै. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांनाही पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष अवधूत पाटील, प्रताप नाईक, प्रशांत बरगे, अनिल माने, सचिन इंगवले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : २५०९२०२१-कोल- अभिवादन
कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान देणारे अण्णासाहेब पाटील यांची ८८ वी जयंती कोल्हापूर मराठा महासंघातर्फे साजरी करण्यात आली. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, अवधूत पाटील, प्रताप नाईक, प्रशांत बरगे आदी उपस्थित होते.