शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांसमोर ‘अंकुश’ आंदोलन

By admin | Updated: February 28, 2017 00:28 IST

५०० रुपयांची बाकी : शेतकऱ्यांना हक्काची रक्कम देण्याची आंदोलन अंकुशची मागणी

शिरोळ : चालू गळीत हंगामात तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळावा, या मागणीसाठी आंदोलन अंकुशच्या वतीने सोमवारी शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील दत्त, गुरुदत्त, जवाहर व पंचगंगा साखर कारखान्यांसमोर एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली दत्त, गुरुदत्त, जवाहर व पंचगंगा साखर कारखान्यांसमोर सोमवारी सकाळी दहा वाजता आंदोलनास प्रारंभ केला. बाजारात साखरेला उच्चांकी प्रतिटन ३७०० ते ३९०० रुपये दर मिळू लागला आहे. शासनाने १६ फेबु्रवारी २०१६ रोजी अधिसूचना काढून उसाचा दर कसा ठरवावा, याचे मापदंड घालून दिले आहेत. त्यानुसार कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप प्रतिटन किमान ४५० ते ५०० रुपये येणे बाकी आहे, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. यापूर्वीही लेखी मागणी करून दुसरा हप्ता देण्याची मागणी केली होती. शिरोळ येथे आंदोलनात सुरेश भोसले, अवधूत काळे, अविनाश पाटील, बाळासाहेब सोमण, रघुनाथ पाटील, सुधाकर उदगावे, रामचंद्र सुतार, संजय मोडके, मारुती नंदिवाले कार्यकर्ते सहभागी झाले होते. गंगानगर येथील पंचगंगा साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर धनाजी चुडमुंगे, कृष्णात गोटे, अवधूत काळे व राकेश जगदाळे यांनी धरणे आंदोलन केले. (प्रतिनिधी)२० दिवसांची मुदतउसाला दर कमी आणि साखर विक्रीतून कारखान्यांना जादा पैसे मिळाले असून, या पैशावर शेतकऱ्यांचा हक्क आहे. यासाठी आंदोलन अंकुशने आंदोलन केले. मागण्यांबाबत येत्या २० दिवसांत निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनाजी चुडमुंगे यांनी दिली.