कोल्हापूर : राज्य पूर्वप्राथमिक सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे थकीत मानधन डिसेंबरपर्यंत मिळणार असल्याची माहिती जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सुवर्णा तळेकर यांनी पत्रकाद्वारे दिली. २०१४ ची भाऊबीज भेटही मिळणार असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.थकीत मानधनाबाबत राज्य पूर्वप्राथमिक सेविका व अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने नुकतेच एकात्मिक बालविकास सेवा योजनाच्या महासचिव वंदना कृ ष्णा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी एप्रिल २०१४ पासून राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे थकीत मानधन व २०१४ सालची भाऊबीज भेट डिसेंबरपर्यंत देण्यात येईल. अनेक ठिकाणी सेविका, मदतनीस यांची रिक्त असलेली पदे भरण्याबाबत प्रकल्पस्तरावर सूचना देण्यात येतील, असे आश्वासन कृष्णा यांनी यावेळी दिले. शिष्टमंडळात सुवर्णा तळेकर, शरद संसारे, जीवन सुरुडे, पार्वती स्वामी, आदी महासंघाचे पदाधिकारी यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
अंगणवाडी सेविकांचे मानधन डिसेंबरपर्यंत मिळणार
By admin | Updated: November 27, 2014 00:51 IST