कोल्हापूर, दि. 10 - विधानसभेत गुरुवारी करविर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्यासाठी तीन महिन्यात कायदा करण्याच्या निर्णयानंतर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर पूजारी हटाओ संघर्ष समितीतर्फे आनंदोत्सव साजरा केला. अंबाबाई मंदिराच्या बाहेरील परिसरात फटाके उडवून आणि साखर-पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.अंबाबाईच्या मूर्तीला घागरा-चोली नेसवल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूरकरांनी श्रीपूजकांवरोधात आंदोलन छेडले होते. या प्रश्नासाठी स्थापन झालेल्या अंबाबाई मंदिर पूजारी हटाओ संघर्ष समितीतील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, दिलीप देसाई, दिलीप पाटील, डॉ. सुभाष देसाई, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, माजी आमदार सुरेश साळोखे, नगरसेवक राजेश लाटकर, आनंद माने, सचिन तोडकर, बाबा पार्टे, आर. के. पोवार, शरद तांबट, अॅड. चारुलता चव्हाण, जयश्री चव्हाण यांच्यासह सोळाजण अधिक आक्रमक आणि आग्रही होते.विधानसभेत स्थानिक आमदारांनी उठवलेल्या आवाजानंतर विधी व न्यायमंत्री रणजित पाटील यांनी अंबाबाई मंदिरात सरकारी पूजारी नेमण्यासंबंधी तीन महिन्यात कायदा करण्याचे जाहीर केल्याचे समजताच संघर्ष समितीचे सदस्य अंबाबाई मंदिराबाहेर जमले व फटाके उडवून निर्णयाचे स्वागत केले. त्यानंतर भाविकांना साखर पेढ्यांचे वाटप करण्यात आले.
अंबाबाई मंदिर संघर्ष समितीकडून कोल्हापूरात आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 19:08 IST
विधानसभेत गुरुवारी करविर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्यासाठी तीन महिन्यात कायदा करण्याच्या निर्णयानंतर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर पूजारी हटाओ संघर्ष समितीतर्फे आनंदोत्सव साजरा केला.
अंबाबाई मंदिर संघर्ष समितीकडून कोल्हापूरात आनंदोत्सव
ठळक मुद्देअंबाबाई मंदिराबाहेर फटाके साखर पेढे वाटून शासन निर्णयाचे स्वागत विधानसभेत स्थानिक आमदारांनी उठवल आवाज