शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

गाठीच्या ठिकाणी भूल दिल्यास पुन्हा कर्करोगाची शक्यता कमी, राजेंद्र बडवे यांचे संशोधन.

By समीर देशपांडे | Updated: September 20, 2022 19:29 IST

स्तनाच्या कर्करोगामध्ये शस्त्रक्रिया हा प्रामुख्याने केला जाणारा उपचार आहे.

कोल्हापूर - निदान लवकर झालेल्या स्तनाच्या कर्करोगात रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी गाठीच्या आसपास सर्व बाजूंनी स्थानिक भूल दिल्यास कर्करोगाची गाठ पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी होण्याचा तसेच मृत्यूचाही धोका कमी झाल्याचे संशोधनामध्ये सिध्द झाले आहे.

११ वर्षांच्या कालावधीत रुग्णांवर केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष टाटा मेमोरियल सेंटर तर्फे पॅरिस येथे झालेल्या युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑनकॉलॉजी (ESMO) वैद्यकीय परिषदमध्ये सेंटरचे संचालक डॉ.राजेंद्र बडवे यांनी सादर केले आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सूरज पवार यांचे या संशोधनामध्ये मोलाचे योगदान आहे.

या नवीन पद्धतीमध्ये संपूर्ण भूल देण्याबरोबरच गाठीच्या आसपास सर्व बाजूने भूल देऊन गाठीतील पेशींचे विभाजन व हालचाल थांबवली जाते. भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर ५ मिनिटांनी शस्त्रक्रिया केली जाते. हा छोटासा प्रयोग प्रभावी ठरला आहे. जागतिक स्तरावर हा अशा प्रकारचा पहिलाच अभ्यास आहे. या प्रयोगामुळे कर्करोग पुन्हा होण्याचे प्रमाण ४ टक्क्यांनी कमी झाले आहे.तर मृत्यूचा धोका देखील कमी झाला आहे.

स्तनाच्या कर्करोगामध्ये शस्त्रक्रिया हा प्रामुख्याने केला जाणारा उपचार आहे. शस्त्रक्रियेनंतर किमोथेरपी, हार्मोनथेरपी, रेडिओथेरपी अशा पुढील उपचार पद्धती पूर्ण केल्यानंतरही अनेकदा कर्करोगाची पुनरावृत्ती होण्याचा धोका असतो. याबाबत टाटा मेमोरियल सेंटर (मुंबई),कोल्हापूर कॅन्सर सेंटर(कोल्हापूर) यासह दिल्ली, गुवाहाटी, अहमदाबाद, हैदराबाद, कन्नूर, शिलॉंग, पुणे, मिरज येथील रूग्णालयांनी एक नवीन सोपी उपचार पद्धती अभ्यासातून सिद्ध केली आहे. कोल्हापूर कॅन्सर सेंटर गेली ११ वर्ष याबाबत संशोधन करत होते. येथील चेअरमन डॉ.सुरज पवार हेच प्रमुख संशोधक म्हणून क्लिनिकल रिसर्च विभागामध्ये कार्यरत आहेत.

टॅग्स :cancerकर्करोग