शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

...अन् लागली सरपंचपदाची लॉटरी

By admin | Updated: April 8, 2015 00:34 IST

सत्ताधारी सदस्यांची गैरहजेरी पडली पथ्यावर

नेसरी : जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या आदेशानुसार बिद्रेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सरपंचपद रिक्त असलेने ते भरण्यासाठी बोलावलेल्या विशेष सभेत सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी एकमेव महिला सदस्या उपस्थित राहिल्याने त्यांना सरपंचपदाची लॉटरी लागली; तर सत्ताधारी सदस्यांकडे बहुमत असूनही या सभेकडे गांभीर्याने न पाहिल्याने त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली. सभेस उपस्थित राहिलेल्या व आपला सरपंचपदाचा अर्ज भरलेल्या लता राजन कांबळे यांच्या गळ्यात अलगदपणे सरपंचपदाची माळ पडल्याने अल्पमतातील विरोधी मंडळींनी बाजी मारली. या निवडीचे आश्चर्य मात्र सर्वत्र व्यक्त होत आहे.बिद्रेवाडी गावची ग्रामपंचायत निवडणूक २०१२ मध्ये झाली होती. सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेने शोभा संजय पाटील या बहुमताने सरपंच, तर सुभाष कुराडे उपसरपंचपदी विराजमान झाले होते. यासाठी स्थानिक पुढारी व नेत्यांनी दीड-दीड वर्षाचा कार्यकाल ठेवला होता. मात्र, पाटील यांनी अडीच वर्षांनंतर आपला सरपंचपदाचा राजीनामा दिला. ४ फेब्रुवारी २०१५ रोजी राजीनामा दिल्याने हे रिक्त पद भरण्यासाठी १८ मार्चच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशान्वये ३० मार्चला दुपारी २ वाजता विशेष सभा बोलावली होती. मात्र, ७ सदस्य असलेल्यापैकी लता कांबळे व दिनकर यल्लाप्पा कांबळे या दोनच सदस्यांनी या विशेष सभेस उपस्थिती लावली. पाच सदस्य गैरहजर राहिले.या सभेत कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यांना उपस्थित सदस्य दिनकर कांबळे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी दिली. त्यांचा अर्ज वैध झाला. मात्र, या सभेचा कोरम पूर्ण होत नसल्याने ही सभा तहकूब केली व दुसऱ्या दिवशी पुन्हा सभा बोलावली. पण या सभेलाही सत्ताधारी असलेल्या ५ सदस्यांनी पुन्हा पाठ फिरवल्याने व तहकूब सभेला कोरमची आवश्यकता नसल्याने आणि अन्य कोणाचा अर्ज आला नसल्याने कांबळे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. (वार्ताहर)