शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

...अन् त्यांची दिवाळी झाली तेजोमय

By admin | Updated: October 24, 2014 00:17 IST

मातोश्री वृद्धाश्रम : सामाजिक संस्था, व्यक्तींकडून दिवाळीसाठी पाठबळ

एम. ए. पठाण -कोल्हापूर -किमान दिवाळी सणाच्या निमित्ताने तरी नातेवाईक आपल्याला भेटायला येतील, घरी घेऊन जातील, या आशेने त्यांच्या प्रतीक्षेतील थकलेले शरीर आणि थिजलेल्या डोळ्यांची निराशा झाली. मात्र, निराधारांना लाखमोलाचा आधार देणाऱ्या पाटोळे कुटुंबीय, सामाजिक संस्था आणि व्यक्तींच्या अखंड प्रेमाने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात दिवाळी तेजोमय होत आहे.पाचगाव येथील आर. के. नगरमधील मातोश्री वृद्धाश्रमात दिवाळीची धामधूम सुरू आहे. येथील आजी-आजोबांना नाही म्हटले तर ओढ असते आपल्या जिवाभावाच्या नातलगांची; पण काल, बुधवारी दिवाळी असूनही कोणाचेही नातेवाईक त्यांच्याकडे फिरकले नाहीत. अशा व्यथित आजी-आजोबांसाठी पाटोळे कुटुंबीयांनी दिवाळीचे नेटके नियोजन केले. दिवाळीदिवशी पहाटे अभ्यंगस्नान, त्यानंतर त्यांना संस्थेतर्फे कपडे देण्यात आली, तर सकाळी सामूहिक फराळाचा कार्यक्रम झाला. दिवाळीदिवशी या आजी-आजोबांच्या मनात नातेवाइकांना न भेटण्याची खंत असली तरी येथील वातावरणातून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बरच काही सांगून गेला. येथे एकूण १३० आजी, आजोबांची सुश्रुषा केली जाते. काल वसंतराव चौगुले हायस्कूलतर्फे फराळाचे साहित्य, उद्योगपती अजित जाधव, शासकीय रुग्णालयातील एक्स-रे विभाग यांच्या हस्ते फराळ, मिठाई वाटप झाली. सायंकाळी कबीर शेख यांच्या हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम झाला. त्यास येथील आजोबा-आजींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज, गुरुवारी लक्ष्मी पूजनादिवशी सायंकाळी अरुंधती महाडिक यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली. तसेच लक्ष्मी पूजन झाल्यानंतर आजी-आजोबा आतषबाजीत सहभागी झाले अन् मातोश्री आश्रमातील माहौलच पालटून गेला. यासाठी संस्थेचे संस्थापक शिवाजी पाटोळे, अ‍ॅड. शरद पाटोळे, लीला पाटोळे, राणी पाटोळे, रोहन पाटोळे व पूर्ण पाटोळे कुटुंबीय यासाठी राबत असते. तसेच सध्या ‘मातोश्री’मध्ये सामाजिक भान ठेवून काही संस्था, व्यक्ती उत्स्फूर्त मदत करत आहेत.आपल्या अडचणीमुळे काही कुटुंबीय आपल्या वृद्ध आई, वडील अथवा नातेवाइकांना मातोश्री वृद्धाश्रमात सोडून जातात. या वृद्धांचा कुटुंबांप्रमाणे येथे सांभाळ केला जात आहे; पण दिवाळीसारख्या सणादिवशी आपल्या वृद्ध आजी, आजोबांना भेटायला येथे येणे किंवा दिवाळीसाठी दोन दिवस घरी घेऊन जाणे हे घडत नसल्याची खंत वाटते. अशी मानसिकता बदलण्याची गरज आहे. -अ‍ॅड. शरद पाटोळे