चिपळूण : दुर्गाशक्ती, सामाजिक चळवऴ, महिला व बालकल्याण क्षेत्रात काम करणारी महिलांची संस्था यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींची विनाशुल्क मुंबई दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती. पेठमाप मराठी, उक्ताड मराठी व रावतळे येथील मराठी शाळांमधील मुलांच्या चेहऱ्यावर त्यामुळे हास्य फुलले.‘चाचा नेहरू झिंदाबाद’च्या गजरात सहल सुरू झाली. ‘देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना विसरू नका, त्यांच्या आत्मचरित्राचे वाचन करा़ तो आपला इतिहास आहे. जो इतिहास विसरला त्याचा वर्तमान, भविष्य अध:कारमय’ झाला, असे उद्गार सहलीला शुभेच्छा देताना, स्वातंत्र्यसैनिक सिंधु भुस्कुटे यांनी काढले़ याप्रसंगी दुर्गाशक्ती अध्यक्ष अश्विनी भुस्कुटे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी, विद्यार्थ्यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबई तेथील प्रगती, बदलती वाहतुकीची साधने व बदलते दुकांनाचे स्वरूप बघणे गरजेचे आहे़ म्हणजेच शाळेबाहेरील जग बघणे आवश्यक आहे, असे सहल आयोजन करण्यामागचा हेतू स्पष्ट करताना सांगितले. दुर्गाशक्तीतर्फे उपाध्यक्षा मनाली जाधव, पुनम काजारे, सिध्दी पाटेकर उपस्थित होत्या़. सहलीसोबत पेठमाप शाळेच्या मुख्याध्यापिका चेतना चव्हाण, ऊक्ताड शाळेचे विलास महाडिक, रावतळेच्या शिक्षिका अश्विनी चव्हाण उपस्थित होत्या़ उरण येथे दीपक ठाकुर व कुटुंबीयांनी या सहलीच्या निवासाची, चहा-नाश्ता व दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली़ सहली दरम्यान गेट-वे-आॅफ इंडिया, ताज हॉटेल, वस्तू संग्रहालय व कमला नेहरू पार्क (हँगिग गार्डन), म्हातारीचा बूट, नेहरू तारांगण, वरळी समुद्र सेतू व सेंटर वन मॉल येथ भेट देण्यात आली. ही सहल यशस्वी होण्यासाठी अशोक भुस्कुटे व हेमंत भोसले यांनी परिश्रम घेतले़ यानिमित्ताने (प्रतिनिधी)
अन् विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं..
By admin | Updated: November 28, 2014 00:07 IST