शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

‘आनंदवन’ला दातृत्वाची ऊब

By admin | Updated: August 25, 2015 00:06 IST

जिल्ह्यातून प्रतिसाद : ३६८ जणांकडून कपडे दान; ७० बॉक्स संकलित

कोल्हापूर : ‘जुने कपडे देऊया, आनंदवन फुलवूया’ अशी भावनिक हाक देत एक सामाजिक उपक्रम म्हणून जिल्हा परिषदेने सुरू केलेले जुने व नवे कपडे संकलित करण्याच्या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी दातृत्वाची ऊब दिली आहे. गेल्या सात दिवसांत जिल्ह्यातून ३६८ दानशूर लोकांनी कपडे दान केले आहेत. आतापर्यंत मोठे ७० बॉक्स भरले आहेत. दातृत्वाचा अक्षरश: वर्षाव सुरू असल्यामुळे दिलेले कपडे ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेला जागेचा शोध घ्यावा लागत आहे. वर्धा जिल्ह्यातील वरोड्याजवळ बाबा आमटे यांनी १९५२ मध्ये ‘आनंदवन’ची स्थापना केली. सध्या ते साडेतीन हजार कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे तेथील कुष्ठरोग्यांसाठी कपडे दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देऊन कर्मचारी संघटना व जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने पुढाकार घेतला. ‘आनंदवनासाठी मदत करा,’ असे आवाहन करणारे लक्षवेधी फलक कार्यालयात दर्शनी भागात लावले आहेत. नवीन, जुने कपडे व अन्य साहित्य संकलित करण्यासाठी कार्यालयाच्या इमारतीमध्ये १७ आॅगस्टपासून व्यवस्था केली आहे. दुसऱ्या दिवसापासूनच कपडे दान करण्यासाठी ओघ वाढला. जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील जिल्ह्यातील कर्मचारी, लोक दान करत आहेत. दान केलेले कपडे ठेवण्यासाठी बॉक्स अपुरे पडत आहेत. शहर, परिसर आणि जिल्ह्यातून ३६८ जणांनी कपडे दान केल्याची नोंद वहीत स्वत:हून केली आहे. सोमवारी दिवसभर जीर्ण कपडे, फाटलेले कपडे बाजूला काढण्याचे काम सुरू होते. स्वच्छ, ड्रायक्लिनिंग व इस्त्री केलेले कपडे ‘आनंदवन’ला पाठविण्यासाठी बॉक्समध्ये पॅकिंग करण्यात आले. एका दिवसात ७० बॉक्स भरले आहेत. पंचायत समितीमध्ये संकलित झालेले कपडे आजपासून जिल्हा परिषदेकडे आणण्यात येणार आहे. ३१ आॅगस्टपर्यंत मुदत असल्याने शंभरापेक्षा अधिक बॉक्स संकलित होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)