लोकमत न्यूज नेटवर्क
तुरंबे : महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी सदस्य स्वर्गीय ॲड. आनंदराव शेळके यांनी समाजकार्याचा घेतलेला वसा नव्या पिढीसाठी स्फूर्तिदायी आहे. कपिलेश्वरसारख्या ग्रामीण भागातून त्यांनी समाजसेवेला प्रारंभ केला आणि राज्याच्या पटलावर गावाचे नाव केले. जनसामान्य जनतेबद्दल त्यांच्या मनात कळवळा होता. त्यांचे कार्य तरुण पिढीला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.
कपिलेश्वर (ता. राधानगरी) येथील सामाजिक नेते स्व. आनंदराव दत्तात्रय शेळके यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच प्रा. विष्णुपंत शेळके होते.
शेळके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रारंभी मारुती धोंडी हातकर व ए. वाय. पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. भाऊ भिवा खामकर यांनी दीपप्रज्वलन केले.
यावेळी बिद्री साखर कारखाना संचालक युवराज वारके, एकनाथ पाटील, बाजार समिती माजी संचालक नेताजी पाटील, गोकुळचे माजी संचालक फिरोजखान पाटील, ‘भोगावती’चे शिवाजी पाटील, टी. बी. पाटील, मधुकर तौंदकर, पांडुरंग मुसळे, पांडुरंग गवते, एम. डी. वरोटे, मारुती वरोटे, गोपाळराव कुराडे, आनंदराव भोई, रंगराव पाटील, रघुनाथ पाटील, पांडुरंग तौंदकर उपस्थित होते. राजेंद्र आडके यांनी सूत्रसंचालन केले. तेजस शेळके यांनी आभार मानले.
फोटो ओळी
कपिलेश्वर येथे ॲड. आनंदराव शेळके यांच्या प्रतिमापूजन प्रसंगी ए. वाय. पाटील, विष्णुपंत शेळके, युवराज वारके, एकनाथ पाटील, नेताजी पाटील.
(जाहिरात होती. बातमी घ्यावी.)