शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आनंद मेणसे यांना यावर्षीचा ‘बागल’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 16:29 IST

कोल्हापूर : बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना यावर्षीचा ‘भाई माधवराव बागल पुरस्कार’ यांना मंगळवारी जाहीर झाला. या पुरस्काराचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २८ मे) सायंकाळी साडेपाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये पुरस्कार वितरण होणार असल्याचे बागल विद्यापीठाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोकराव साळोखे आणि कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील आणि यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देआनंद मेणसे यांना यावर्षीचा ‘बागल’ पुरस्कारमंगळवारी वितरण होणार; मल्लिनाथ कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर : बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना यावर्षीचा ‘भाई माधवराव बागल पुरस्कार’ यांना मंगळवारी जाहीर झाला. या पुरस्काराचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २८ मे) सायंकाळी साडेपाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये पुरस्कार वितरण होणार असल्याचे बागल विद्यापीठाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोकराव साळोखे आणि कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील आणि यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.अ‍ॅड. साळोखे म्हणाले, कम्युनिस्ट चळवळीतील कार्यकर्ते असणाऱ्या प्रा. आनंद मेणसे यांचा बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांची संघटना स्थापन करण्यात पुढाकार होता. या संघटनेचे अनेक वर्ष कार्यवाह म्हणून काम पाहिले. मराठी विद्यानिकेतन ही शाळा स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता. रवळनाथ हौसिंग फायनान्स को-आॅप. सोसायटीच्या बेळगाव शाखेचे चेअरमन, दि. बेळगाव सिटी मजदूर को-आॅप सोसायटीचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

अन्नपूर्णा महिला मंडळाची त्यांनी स्थापना केली. बेळगाव सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्ष, तर कॉ. कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठाच्या खजिनदाराची त्यांनी जबाबदारी सांभाळली. पत्रकारिता त्यांनी केली. विविध दहा पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यावर्षीच्या ‘भाई माधवराव बागल’ पुरस्काराने प्रा. मेणसे यांना गौरविले जाणार आहे.

शाल, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्राचार्य पाटील म्हणाले, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवराव बागल यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता स्मृती अभिवादन समारंभ आयोजित केला आहे. छत्रपती राजर्षी शाहू मिलसमोरील भाई बागल यांच्या पुतळ्याच्या परिसरात हा अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. या पत्रकार परिषदेस चंद्रकांत यादव, व्यंकाप्पा भोसले, संभाजीराव जगदाळे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर