शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

कोल्हापूरचे प्रेक्षक आनंद लुटणारे

By admin | Updated: December 28, 2014 00:28 IST

सयाजी शिंदे : चित्रपट महोत्सवात ‘खाली डोकं, वरती पाय’ला तीन पारितोषिके

कोल्हापूर : ‘कोल्हापूरचे प्रेक्षक नंबर एकचे लुटारू आहेत. ते नेहमी चांगल्या गोष्टींचा पुरेपूर, मनमुराद आनंद लुटत असतात,’ अशी मिश्कील टिप्पणी सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज, शनिवारी कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात बोलताना केली. या चित्रपट महोत्सवात ‘खाली डोकं, वरती पाय’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तीन पुरस्कार मिळाले. गेले आठ दिवस येथील शाहू स्मारक भवनात पार पडलेल्या चित्रपट महोत्सवात ४० लघुपट, तर ५० चित्रपट दाखविण्यात आले. आज या महोत्सवाचा सांगता आणि पारितोषिक वितरण समारंभ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. चित्रपट महोत्सवाची तिकिटे आदल्या वर्षी काढणारा प्रेक्षकही याच कोल्हापुरात पाहायला मिळतो, महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळतो, हे प्रेक्षकांचे मोठेपण आहे, असे गौरवोद्गारही सयाजी शिंदे यांनी यावेळी काढले. बॅँक आॅफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर नंदकुमार पुजारी यांनी कोल्हापूर, कोेल्हापूरचे प्रेक्षक आणि येथील वैशिष्ट्य स्वरचित कवितेतून सांगितले. त्यांच्या कवितेला रसिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. सुभाष भुर्के यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात चंद्रकांत जोशी यांनी चित्रपट महोत्सवाचा आढावा घेत, अशा चित्रपट महोत्सवातून नव्या विचाराच्या, नव्या दमाच्या दिग्दर्शकांना अधिक प्रगल्भता, विचारशक्ती येईल, असा विश्वासही जोशी यांनी व्यक्त केला. यावेळी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, कन्नड अभिनेत्री ऋतिका, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व चित्रपटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीप बापट यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)या चित्रपट महोत्सवात घेण्यात आलेल्या चित्रपट स्पर्धेचा निकाल दिलीप बापट यांनी घोषित केला. महोत्सवात दाखविण्यात आलेल्या ‘खाली डोकं, वरती पाय’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ११ हजार रुपये, गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याच चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार अजयसिंग याना देण्यात आला; तर बालकलाकार शुभम् मोरे याला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून रफिक बगदादी, अशोक राणे, संस्कार देसाई यांनी काम पाहिले. महोत्सवात देण्यात आलेले पुरस्कार४सर्वाेत्कृष्ट दिग्दर्शक - तानाजी महादेव घाडगे (चित्रपट - बरड)४सर्वोत्कृष्ट अभिनेता - सुहास पळशीकर (बरड)४सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - स्मिता तांबे (कॅँडल मार्च) व तेजस्विनी पंडित (सेव्हन रोशन व्हिला)