शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंगडिया व्यावसायिकांना सराफ बंदचा फटका

By admin | Updated: March 4, 2016 01:03 IST

व्यवसाय कोलमडला : शहरातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान

तानाजी पोवार -- कोल्हापूर  शहरातील सराफ व्यवसाय गेले दोन दिवस बंद आहे. या सराफ व्यावसायिकांवर अवलंबून असणाऱ्या शहरातील अंगडिया कुरिअर सर्व्हिसला गेल्या दोन दिवसांत सुमारे ६५ लाखांचा फटका बसला आहे. सराफ व्यवसाय बंद राहिल्याने पर्यायाने अंगडिया सर्व्हिसही पूर्णत: कोलमडली असल्याने बुधवारी काही प्रमाणात सुरू असलेली ही सेवा गुरुवारी बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. याशिवाय जिल्ह्यातील गांधीनगर, इचलकरंजी या ठिकाणीही ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय या व्यावसायिकांनी घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात किमान एक कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती अंगडिया व्यावसायिकांनी दिली.केंद्रीय अबकारी कराच्या निषेधार्थ देशभर सराफ व्यावसायिकांनी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. त्यामुळे कोल्हापुरातही गेले दोन दिवस सराफ बाजारपेठ बंद स्थितीत आहे. अंगडिया कुरिअर सर्व्हिस पूर्णत: कोलमडली आहे. बुधवार (दि. २) पासून सराफ व्यावसायिकांनी हा बंद पुकारला असला तरी त्या दिवशी सायंकाळी ही सेवा काही प्रमाणात सुरू होती, पण गुरुवारी ही सेवा बंद झाली. दररोज मुंबईला माल रवानाकोल्हापुरातून मुंबई बाजारपेठेत दररोज रात्री नऊ वाजता पार्सल पाठविली जातात. कोल्हापुरातून ११ अंगडिया व्यावसायिकांपैकी किमान सहाजणांचे स्वतंत्र टेम्पो अथवा सुमो या चारचाकी वाहनाने माल पाठविला जातो. इतर व्यावसायिकांचे कर्मचारी कमी माल असल्यास दररोज खासगी बसेस अथवा एस. टी. महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करून मुंबईपर्यंत माल पोहोचवितात. गुजरात व इतर ठिकाणी जाणारा माल मुंबईत गेल्यानंतर तेथून वेगवेगळ्या ठिकाणी पाठविला जातो.विश्वास महत्त्वाचाकोल्हापूर शहराच्या सराफ बाजारपेठेतून दररोज किमान ३५ ते ४० लाखांची उलाढाल या अंगडिया व्यावसायिकांमार्फत होते. संपूर्ण व्यवसाय हा विश्वासावरच अवलंबून असल्याने अनेक सराफ व्यावसायिकांचे अंगडिया व्यावसायिकांशी अनेक वर्षांपासूनचे संबंध जुळले आहेत. त्यामुळे प्रत्येक सराफ व्यावसायिक आपला माल पाठविताना ठरावीकच अंगडिया कुरिअर सर्व्हिसकडेच माल देत असतो. यामध्ये विश्वासाचा दुवा महत्त्वाचा मानला जातो.बहुतांश व्यावसायिक परप्रांतीयकोल्हापूर शहरातील सराफ बाजारपेठेत अंगडिया सर्व्हिसमध्ये फक्त एकच महाराष्ट्रीय असून बाकी सर्व व्यावसायिक हे परप्रांतीय आहेत. तरीही या अंगडिया व्यावसायिकांवर सराफ व्यावसायिकांचा विश्वास जडला आहे, पण अनेक वेळा यातून धोकाही निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.मालाचे दरसराफ बाजारपेठेतून दागिने पाठविताना चांदीचा दर हा किलोवर, तर सोन्याचा दर हा किमतीवर आकारला जातो. चांदीच्या एक किलोच्या दागिन्यावर १०० रुपये, तर सोन्याच्या एक लाखाच्या दागिन्यावर १५० ते २०० रुपयांपर्यंत दर आकारला जातो.