सांगली : ‘क्लीन सिटी’चा संदेश देत आज, बुधवारी अवघी सांगली शहीद मॅरेथॉन स्पर्धेत धावली. पुरुषांमध्ये जतच्या अमोल पडोळकरने, तर महिलांमध्ये सांगलीच्या प्रियांका पवारने प्रथम क्रमांक पटकावला.शहीद अशोक कामटे स्मृती फौंडेशनतर्फे तिसऱ्या शहीद मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन आ. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते निशाण दाखवून झाले. विश्रामबाग चौकातून स्पर्धेस प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसेनानी बापूसाहेब पाटील होते. पारितोषिक वितरण उद्योजक गिरीष चितळे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते झाले. सचिन हरोले यांनी स्वागत केले. मुस्तफा मुजावर यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक संतोष पाटील, प्रा. प्रदीपकुमार चव्हाण, अमोल झांबरे, अॅड. एस. एम. पखाली, तिमीर आरवारे, प्रा. पी. एस. कांबळे, सुरेश चव्हाण, उदयकुमार पाटील, अपघातमित्र अरुणोदय पै, आदी उपस्थित होते. पंच म्हणून सुभाष सूर्यवंशी, संजय पाटील, बापू समलेवाले, लक्ष्मी पाटील, जितेंद्र पाटील यांनी काम पाहिले. राहुल कांबळे, इनायत तेरदाळकर, योगेश रोकडे यांनी संयोजन केले. स्पर्धेचा अनुक्रमे एक ते पाच क्रमांकांपर्यंतचा अंतिम निकाल असा : खुला गट : पुरुष : अमोल पडोळकर, विशाल शेंडगे, अनिल गडदे, अंतोषकुमार व्हनकडे, सुनील माने. महिला : प्रियांका पवार, विद्याश्री देसाई, सुनीता पाटील, प्रियांका घार्गे, मयूरी मायाण्णा. १४ वर्षांखालील गट : मुले : सतीश सरगर, राहुल कारंडे, परमानंद मसाळे, विनायक मसाळे, ओंकार व्हनमाने. मुली : प्रियांका जाधव, कोमल निकम, मोहिनी इसापुरे, साक्षी करमुथे, अमृता कांबळे. २० वर्षांखालील गट : मुले : रोहित कळेकर, आकाश चौगुले, मोहन परीट, प्रताप पोपळे, नरेश मुखीया. मुली : प्रियाकुमारी खरवार, धनश्री गोर, रेवती राजमाने, पूनम हाक्के, मनीषा वाघमोडे. (क्रीडा प्रतिनिधी)
अमोल, प्रियांका प्रथम
By admin | Updated: November 27, 2014 00:14 IST